Friday, September 11, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City तेनजिंग नोर्गे साहस पुरस्कार विजेती गिर्यारोहक प्रियांका मोहिते हिचा खा श्री छ...

तेनजिंग नोर्गे साहस पुरस्कार विजेती गिर्यारोहक प्रियांका मोहिते हिचा खा श्री छ उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने करण्यात आला सत्कार

395
Adv

तेनजिंग नोर्गे साहस पुरस्कार विजेती गिर्यारोहक प्रियांका मोहिते हिचा सत्कार आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने उपनगराध्यक्ष मनोज शेंडे,नगरसेवक बाळासाहेब ढेकणे विनीत पाटील,गोलू साळुंखे,वैभव पोतदार,सुधीर काकडे आदी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला

प्रियांका मोहिते या गिर्यारोहकाने जगातील उत्तुंग शिखरं सर करण्याची कामगिरी केली या कामगिरीचे कौतुक करत तिला राष्ट्रपतींच्या हस्ते तेनजिंग नॉर्गे साहस पुरस्काराने गौरविण्यात आले प्रियांकाची ही कामगिरी आज-काल मोबाईलच्या वेड्यात अडकलेल्या युवक व युवतींना प्रेरणादायी असून तिच्या पुरस्काराने जिल्ह्याचा नावलौकिक अजूनच उंचावला असून भविष्याती ही तिला उत्कृष्ट असे पुरस्कार मिळून जिल्ह्याचा नावलौकिक नक्कीच वाढेल असा विश्वास तिच्या कुटुंबीयांनी सातारानामाशी बोलताना सांगितले

साहसी खेळात प्रियांकाने दिलेल्‍या योगदानाची दखल राज्‍य शासनानेदेखील घेतली आहे. गिर्यारोहण प्रकारात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या प्रियांकाला केंद्र सरकारने तेनसिंग नॉर्गे साहस पुरस्‍कार जाहीर केला होता. हा पुरस्‍कार राष्‍ट्रपतींच्या हस्ते तिने (ता. १३) स्‍वीकारला. असून उत्कृष्ट असे पुरस्कार तिला मिळावेत अशा शुभेच्छाही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूहच्या वतीने देण्यात आल्या

Adv