Saturday, April 25, 2026
spot_img
Home Maharashtra जिल्हा बँक निवडणुकीत दस्तुरखुद्द सहकारमंत्री व गृहराज्यमंत्री यांची प्रतिष्ठा पणाला

जिल्हा बँक निवडणुकीत दस्तुरखुद्द सहकारमंत्री व गृहराज्यमंत्री यांची प्रतिष्ठा पणाला

416
Adv

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आज दि. 10 रोजी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 8 जागा बिनविरोध झाल्या असून एकूण 11 जागा बिनविरोध झाल्या आहेत यामध्ये आता महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते राज्याचे सहकारमंत्री असलेले बाळासाहेब पाटील व माजी सहकारमंत्री सुपुत्र असलेले उदयसिंह उंडाळकर तर पाटण येथे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई व माजी मंत्री सुपुत्र असलेले सत्यजित पाटणकर यांच्या लढतीकडे

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध झालेल्यां पैकी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व अन्य मान्यवर आज बिनविरोध झाले आहेत

सहकारमंत्री व गृहराज्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

सहकार बँकेच्या निवडणुकीत दस्तुरखुद्द राज्याचे सहकारमंत्री असलेले बाळासाहेब पाटील हे बिनविरोध होऊ न शकल्याने त्यांना आता आव्हान आहे ते माजी सहकारमंत्री सुपुत्र उदयसिंह उंडाळकर यांचे त्यामुळे सहकारमंत्र्यांच्या निवडणूकी कडे राज्याचे लक्ष लागले आहे तर दुसरीकडे राज्याचे गृहराज्यमंत्री असलेले शंभूराजे देसाई यांना आव्हान आहे ते पारंपारिक स्पर्धाक माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र सत्यजीत सिंह पाटणकर यांचे त्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे

Adv