Saturday, April 25, 2026
spot_img
Home Satara District Satara City स्थानिक विकास निधीतून विलासपूरला पायाभूत सुविधा देणार छ उदयनराजे

स्थानिक विकास निधीतून विलासपूरला पायाभूत सुविधा देणार छ उदयनराजे

601
Adv

विलासपूर हा भाग नव्याने सातारा शहराच्या हद्दीत आला आहे या भागातील नागरिकांना पायाभूत सोयी स्थानिक विकास निधीतून उपलब्ध करण्यात येतील अशी ग्वाही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली .

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व युवा उद्योजक संग्राम बर्गे यांच्या पुढाकाराने बापूजी साळुंखे नगर येथे होत असलेल्या बगीचा आणि ओपन जीमच्या भूमीप्रसंगी छ उदयनराजे बोलत होते .यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, आशाताई जाधव, बाळासाहेब पिसाळ, किरण नानवडे, सतीश माने, राहुल पाटोळे, विकास पवार, महेश चौगुले आबा शिंदे, काका बागल, उदय मराठे, अरूण राजेभोसले उपस्थित होते .

छ उदयनराजे पुढे म्हणाले, विलास पूर भागातील नागरिकांचा विरंगुळा आणि आरोग्य या कारणांसाठी बगीचा व ओपन जीम उभारण्यात येत आहे . ही विकासकामे स्थानिक विकास निधीतून करण्यात येणार आहे . या भागाच्या विकासाकरता आम्ही कायमच सिध्द आहोत . विलासपूर हा भाग नगर पालिकेच्या हद्दीत आल्याने या भागाला सेवा सुविधा उपलब्ध निश्चितपणाने करून दिल्या जातील .विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे . येथे विकासकामे झाली म्हणून आम्ही निवांत बसणार नाही . या भागासाठी नगरोत्थान योजनेतून जास्तीत जास्त निधी देण्याचा आमचा प्रयत्न विलासपूरच्या मुख्य रस्त्यावर पथदिवे उजळले आहेत . याशिवाय वाढीव पाणी पुरवठा योजना, प्रशस्त उद्यानं ,जॉगिंग ट्रॅक, चारही बाजूने संरक्षक भिंत इं सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करण्याचे आश्वासनं श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी दिले .

Adv