Wednesday, April 22, 2026
spot_img
Home Satara District Satara City सातारा पालिकेची स्थायी समितीची सभा स्थगित वेबेक्स प्रणालीचा तांत्रिक घोळ

सातारा पालिकेची स्थायी समितीची सभा स्थगित वेबेक्स प्रणालीचा तांत्रिक घोळ

140
Adv

तब्बल चार महिने लॉक डाऊन मुळे लटकलेली स्थायी समितीची ऑनलाईन सभा वेबेक्स प्रणालीच्या तांत्रिक घोळात लटकली .विषय सभापती व सदस्यांच्या आवाजाचे प्रतिध्वनी उमटू लागल्याने सुरळीत कामकाजाची अडचण झाली त्यामुळे सभा स्थगित करण्यात आली .

ही सभा आता शुक्रवारी दि 14 रोजी सकाळी अकरा वाजता घेण्यात येणार आहे .लॉक डाऊन पूर्वीची शेवटची स्थायी समितीची शेवटची सभा 18 फेब्रुवारी 2020 रोजी झाली होती . त्यामुळे काही महत्वाचे दर मंजुरीचे विषय घेऊन त्यांला मान्यता देण्यासाठी तब्बल साडेसहा महिन्यानी वेबेक्स प्रणालीच्या माध्यमातून ऑन लाईन सभा घेण्याचे ठरले होते . अजेंडयावर तब्बल 114 विषय घेण्यात आले . नगराध्यक्ष माधवी कदम व प्रशासन अधिकाऱ्यांनी या सभेला सभागृहातून उपस्थिती नोंदवली . मात्र काही सभापतींना या तांत्रिक बाबीचा उलगडा न झाल्याने त्यांनी सभागृहात बैठक मारली मात्र ऑनलाईन बैठकीला हजर झालेल्या सभापतींचे आवाजाचे प्रतिध्वनी एकमेकांनाच ऐकायला यायला लागल्याने सभागृहात एकाच वेळी अनेक आवाजांचा कलकलाट सुरु झाला .

त्यामुळे सभेत नक्की काय चर्चा होतेय हे कोणालाच समजेना . शेवटी नगराध्यक्ष माधवी कदम यांनी स्थायी समितीची आजची सभा स्थगित करून गुरुवारी सभा नेहमीच्या वेळेत घेण्याचे आदेश दिले .

Adv