Friday, September 11, 2026
spot_img
Home Satara District Satara City साताऱ्याच्या मुख्याधिकारी पदी अभिजीत बापट यांची वर्णी रंजना गगे यांची महिन्याभरात बदली

साताऱ्याच्या मुख्याधिकारी पदी अभिजीत बापट यांची वर्णी रंजना गगे यांची महिन्याभरात बदली

159
Adv

सोलापूर महापालिकेचे उपायुक्त अभिजीत बापट यांची सातारा पालिकेच्या मुख्याधिकारी पदी वर्णी लागली आहे . अवध्या महिनाभरात मुख्याधिकारी रंजना गगे यांच्या बदलीमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे .

मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या बदलीनंतर २ जुलै रोजी रंजना गगे सातारा पालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा भार सांभाळला होता . लक्ष्मी टेकडी परिसरात कायद्याचा बडगा दाखवून त्यांनी केलेल्या अँटी जेन टेस्ट कामाची चांगलीच चर्चा झाली त्यामुळे तेथील करोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले . कामचुकार अधिकाऱ्यांना शिस्तीचा चाप लावण्यात त्यांनी कसूर केली नाही . प्रशासकीय कारभाराचे गाडे सुरळीत करत असताना रंजना गगे यांच्या जागी सोलापूर महापालिकेचे उपायुक्त म्हणून अभिजीत बापट यांची प्रशासकीय बदली झाल्याचे नगरविकास विभागाकडून लेखी पत्र मंगळवारी सायंकाळी प्राप्त झाले .

2012 ते 16 या चार वर्षात बापट यांनी आधी साताऱ्यात नगर प्रशासन अधिकारी म्हणून आणि त्यानंतर तीन वर्ष म्हणून सातारा पालिका मुख्याधिकारी म्हणून सेवा बजावली होती . खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्र राजे भोसले यांच्याशी उत्तम समन्वय असणारे मुख्याधिकारी म्हणून अभिजीत बापट यांची ओळख आहे . मुख्याधिकारी रंजना गगे यांच्या प्रशासकीय सेवेचे बावीस महिने शिल्लक होते त्यांनी सुद्धा पुणे विभागात बदली मिळावी यासाठी विनंती अर्ज नगर विकास विभागाकडे केला होता ..

साताऱ्यातील काही राजकीय कार्यकर्त्यांची मनधरणी करून ही राजकीय गोळाबेरीज करण्यात कोठेही कसर ठेवण्यात आली नाही . सातारा विकास आघाडीच्या पसंतीचे मुख्याधिकारी साताऱ्यात आल्याने पालिका वर्तुळात पुन्हा एकदा राजकीय वर्दळ सुरू झाली आहे .

Adv