Wednesday, April 22, 2026
spot_img
Home Maharashtra गङ किल्ल्याबाबत माझ्या बोलण्याचा विपर्यास: उदयनराजे भोसले निवडणुका आल्या की चारित्र्यहननाचा प्रयत्न...

गङ किल्ल्याबाबत माझ्या बोलण्याचा विपर्यास: उदयनराजे भोसले निवडणुका आल्या की चारित्र्यहननाचा प्रयत्न किळसवाने

168
Adv

 गड- किल्ल्यांबाबत मी केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे स्पष्टीकरण श्री छ. उदयनराजे भोसले यांनी केले. दरम्यान निवडणुका आल्या की चारित्र्यहनन  करणे हे  किळसवाणे असून गड-किल्ल्यांवर डान्सबार, बार उघडा असे म्हणण्याचा विचार मनात येण्यापेक्षा मेलेलं बरं, अशी प्रतिक्रियाही उदयनराजे यांनी वाई येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

गड , किल्ले ही छत्रपती शिवरायांची आठवण व पराक्रमाची प्रतीक असून गड – किल्ल्यांचे संवर्धन व्हावे,असे माझे म्हणणे आहे. याबाबत राज्य शासनानेही नियोजन केले आहे. गड किल्ल्याबाबत मी जे वक्तव्य केलेच नाही त्याचे खापर माझ्यावर फोडण्याचा  काहींचा प्रयत्न होत आहे. गड, किल्ले पुरातत्व विभागाच्या ताब्यात असून लोकांना किल्ल्यावर जाता यावे, राहण्याची व्यवस्था असावी यासाठी याठिकाणी काही आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य शासनाने भूमिका मांडली.त्या भूमिकेनुसार गड-किल्ल्यांच्या त्याला निवासाची सोय असावी पायथ्याशी राहण्याची व्यवस्था असावी, गडावर जाण्यासाठी रोपवे असावा, अशी भूमिका मी मांडली होती. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे. मी जे बोललो ते बोललो मात्र मी जे बोललोच नाही त्याचे खापर माझ्यावर फोडले जात आहे. गड, किल्यावर डान्सबार, बार उघडा असे म्हणण्याचा विचार जरी मनात आला तर त्यापेक्षा मेलेलं बर, असेही उदयनराजे म्हणाले.

मी काही दिवसांपूर्वी एका दैनिकाला मुलाखत दिली होती. त्यावेळी मी गड, किल्याबाबत माझी भूमिका मांडली होती. जे मी बोललो नाही त्याचे खापर माझ्यावर फुटणार असेल तर बरोबर नाही.ऐतिहासिक वास्तूंची डागडुजी झाल्यास पर्यटन वाढीस चालना मिळून रोजगार निर्मिती होणार आहे.मी संकुचित बुद्धीचा नसून निवडणूक आली की माझ्या चारित्र्यहननाचा काहीजणांकडून कट शिजवला जातो, असा आरोपही उदयनराजे भोसले यांनी केला.

 दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साताऱ्यात गुरुवारी सभा होत असून या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न पंतप्रधान मोदी यांच्याकडे मांडणार असून जिल्ह्याच्या विकासात कुठेही कमी पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उदयनराजे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. सातारा जिल्ह्यासाठी तुम्ही काय केले ते सांगा असे आव्हानही त्यांनी केले.

Adv