Friday, April 24, 2026
spot_img
Home Satara District Khandala सलग पन्नास वर्षे गावची निवडणूक बिनविरोध. ज्येष्ठ पत्रकार पाटणे यांची पुन्हा एकदा...

सलग पन्नास वर्षे गावची निवडणूक बिनविरोध. ज्येष्ठ पत्रकार पाटणे यांची पुन्हा एकदा कमाल

211
Adv

खंडाळा तालुक्यातील वाण्याचीवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच बिनविरोध झाली . तीन प्रभागांमधुन सात सदस्य निवडण्यात येणार होते . पुढारीचे वृत्त संपादक हरीष पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी बैठक घेऊन सात सदस्यांची बिनविरोध निवड केली . अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सातही उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले . गत पन्नास वर्षापासुन बिनविरोध निवडणुक करणारे सातारा जिल्ह्यातील पहिले गाव होण्याचा मान वाण्याचीवाडी ग्रामपंचायतीने मिळवला .
वाण्याचीवाडी येथील चौणेश्वर वार्ड क्र .1 मधुन संदीप बबन भिलारे ( सर्वसाधारण पुरुष ) , रत्नमाला अनिल महाजन ( ओबीसी महिला ) , रत्नमाला ताराचंद मोरे ( सर्वसाधारण महिला ) हनुमान वार्ड क्र .2 मधून शंकर राजाराम पाटणे ( सर्वसाधारण पुरुष ) , विजया प्रकाश भिलारे ( सर्वसाधारण महिला ) लक्ष्मीनारायण वार्ड क्र .3 मधून प्रिया प्रमोद भिलारे ( सर्वसाधारण महिला ) , सतिश रामचंद्र महाजन ( ओबीसी पुरुष ) अशा सात जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले .विरोधी अर्ज दाखल न झाल्याने वाण्याचीवाडी ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले .
सर्वानी उमेदवारी दाखल केल्यानंतर पंचायत समितीच्या प्रांगणातील स्व . यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन केले . गावची एकजुटीची परंपरा राखीत गावच्या विकासासाठी एकदिलाने काम करू. अशा प्रतिक्रीया उमेदवारांनी व्यक्त केल्या .

Adv