Friday, September 11, 2026
spot_img
Home Satara District Satara City फरार राजेंद्र कायगुडे, गणेश टोपे प्रवीण यादव या तिघांचे निलंबन

फरार राजेंद्र कायगुडे, गणेश टोपे प्रवीण यादव या तिघांचे निलंबन

120
Adv

सातारा नगरपालिकेचे लाचखोर उपमुख्याधिकारी संचित कृष्णा धुमाळ। राजेंद्र कायगुडे, प्रवीण यादव, गणेश टोपे यांना निलंबनाची करण्याचे आदेश मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी बजावले. संचित धुमाळ यांच्या निलंबननाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नगरपरिषद संचालनालयाला पाठवण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी याप्रकरणातील सहभागी संशयित राजेंद्र कायगुडे, गणेश टोपे, प्रवीण यादव या तिघांच्या निलंबन आदेशामुळे पालिका वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली.

बेपत्ता कायगुडे यांच्या निवासस्थानी ही ऑर्डर पोस्टाने पाठवण्यात आली आहे. दरम्यान, संचित धुमाळ, टोपे आणि यादव यांना जिल्हा सत्र न्यायालयाने दुपारी अडीच वाजता जामीन मंजूर केला. या जामिनात अटीशर्तीप्रमाणे त्यांना तपासकार्यात पोलिसांना सहकार्य करावयाचे आहे. स्वच्छता ठेकेदाराला अनामत रक्कम परत देण्याच्या निमित्ताने संचित धुमाळ यांना 2 लाख 30 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवार दि. 8 जून रोजी रंगेहाथ पकडले होते. धुमाळ यांच्या दालनातच ही कारवाई झाली होती.

या अनुषंगाने गणेश टोपे व प्रवीण यादव यांची नावे समोर आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. या करवाईचे सातारा पलिकेत मोठे पडसाद उमटले. उपमुख्याधिकाऱ्यांच्या अपरोक्ष सध्या कोव्हिड कक्षाची जबाबदारी प्रणव पवार पाहत आहेत. त्यांच्या दिमतीला अतुल दिसले, सतीश साखरे व शैलेश अष्टेकर हे नवीन चेहरे आरोग्य विभागात देण्यात आले आहेत.

Adv