नगरपालिकेच्या अभियंत्याला लाच घेताना अटक

60
Adv

खोपोली नगरपालिकेच्या एका अभियंत्याला कंत्राटदाराकडून 75 हजार रुपयांची लाच घेताना आज अटक करण्यात आली. शशिकांत दिघे असे अटक करण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव आहे. ठाणे विभाग लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

एका जलशुद्धीकरण प्रकल्पाभोवती सीमाभिंत बांधण्याचे काम एका कंत्राटदाराला देण्यात आले होते, त्या कामाचे डिपॉझीट परत करण्यासाठी या अभियंत्याने त्याच्याकडे 75 हजार रुपयांची लाच मागितली होती. कंत्राटदाराने त्या विषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी सापळला रचून त्याला रंगेहाथ अटक केली.

त्याच्याकडील मालमत्तेची आता चौकशी सुरू करण्यात आली असून या आधी कोणत्या प्रकरणात त्याने असा प्रकार केला आहे याचीही चौकशी सुरू आहे.

Adv