लाचलुचपत विभागाच्या कारवाईनंतर अनेक फायली गायब झालेली चर्चा होती मात्र पुन्हा एकदा गट्टे बाहेर आल्याने हे नेमके कशाचे आहेत हे मात्र समजू शकले नाही प्रशासनाने याची चौकशी केली तर ते गट्टे कशाचे हे समजून येईल
सातारा पालिकेतील भ्रष्टाचारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. मात्र लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनंतर नगरपालिकेतील अनेक विभागांत धावपळ सुरु झाली आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर फाईलींची दोन पोती लांबवली असून पुन्हा अशाच प्रकारच्या दोन फायलींचे गट्टे लांबवले असल्याने ? या प्रकाराचीही चौकशी करावी, अशी मागणी होवू लागली आहे.
नगरपालिका कारभाराला शिस्त ना वळण. कुणीही कसाही वागतो. प्रत्येकाचे नियम वेगळे, कायदे निराळे आहेत. वरिष्ठांनी दटावल्यास हे अधिकारी जिरवाजिरवी करतात. त्यामुळे नोटीस देण्यापलिकडे कोणतीही कारवाई होत नसल्याचे सध्याचे चित्र आहे आरोग्य विभागात झालेल्या कारवाई झटका भांडार विभागापासून आस्थापना विभागापर्यंत बसला. त्यामुळे बर्याच जणांची पळापळ झाली. मात्र पालिकेतील पोती फाईली दुचाकीवरुन लांबवल्या. त्यामुळे उर्वरित कर्मचार्यांनी या प्रकाराबाबत शंका उपस्थित केल्या आहेत.?
लाच लुचपतने केलेल्या कारवाईच्या अनुषंगानेच महत्वाच्या फाईली गायब करण्याचा हा खटाटोप असल्याने शंका व्यक्त केल्या जात असून संबंधितांची तातडीने चौकशी करावी, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावे, अशी मागणी होवू लागली आहे.