Saturday, April 25, 2026
spot_img
Home Satara District Satara City नगरसेवक प्रशांत आहेरराव यांच्या कडुन आरोग्य कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्क वाटप

नगरसेवक प्रशांत आहेरराव यांच्या कडुन आरोग्य कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्क वाटप

132
Adv

सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये कार्यरत असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना नगरसेवक प्रशांत आहेरराव व मित्र समूहाच्यावतीने सॅनिटायझर, मास्क, हँडग्लोजचे वाटप करण्यात आले.

भारतातील विविध राज्यांत कोरोनाची दहशत वाढू लागली आहे. अशा परिस्थितीतही विविध भागात सफाई कामगार आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून परिसर स्वच्छ राखण्यात मोलाची कामगिरी बजावत आहेत. त्यांना दररोज नवीन मास्क, हॅन्डग्लोज आणि सातत्याने सॅनिटायझरचा वापर करावा लागत आहे. ही गरज ओळखून सातारा नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक प्रशांत आहेरराव यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क, हॅन्डग्लोज आणि सॅनिटायझर वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्याला त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी ही प्रतिसाद दिला खासदार श्री छ उदयनराजे भोसले यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.

यावेळी नगरसेवक प्रशांत आहेरराव, जितेंद्र खानविलकर, विजय तावडे, संतोष पवार, आशुतोष निगडे तसेच सफाई कामगार आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Adv