Saturday, April 25, 2026
spot_img
Home Satara District Satara City पालिकेच्या गाळ्यातील अजिंक्य चायनीज मुळे पालिकेचे पाणीपुरवठा कर्मचारी यांचे आरोग्य धोक्यात

पालिकेच्या गाळ्यातील अजिंक्य चायनीज मुळे पालिकेचे पाणीपुरवठा कर्मचारी यांचे आरोग्य धोक्यात

114
Adv

सातारा पालिकेतील जुनया नगरपालिका येथील जागेतील अजिंक्य चायनीज शालिनी हॉटेल व इतर हॉटेल्स मुळे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्य धोक्यात आले आहे

सातारा पालिकेचा पाणी पुरवठा विभाग हा मोती तळ्या शेजारी आहे शहरातील पाणीपुरवठा म्हणजेच अग्निशामक ,छोटे टँकर ,येथून वितरण करण्यात येतात येथील कर्मचाऱ्यांना अजिंक्य चायनीज, शालिनी हॉटेल ,स्वाद चायनीज ,अन्य हॉटेलचा त्रास होत असून सर्व हॉटेल धारक सर्व कचरा ओढ्यामध्ये टाकतात याकडे कुणाचे लक्ष नसून सर्व घाणीमुळे दुर्गंधी पसरली आहे अजिंक्य चायनीज ची पाईपलाईन फुटल्याने सर्व खरकटे तेल हे पाणी पुरवठा विभागाच्या दारात वाहून येत असल्याने प्रचंड दुर्गंधी चा कर्मचाऱ्यांना सामना करावा लागत आहे

संबंधित चायनीज सेंटर सह इतर हॉटेल धारकांना तात्काळ नोटीस बजावणार असल्याचे पालिकेच्या आरोग्य सभापती अनिता अशोक घोरपडे यांनी सातारा नामाशी बोलतांना सांगितले असून जो कोणी दुर्गंधी पसरवत असेल त्यांना दंडही केला जाणार असल्याचे आरोग्य सभापती यांनी सांगितले

Adv