दीड कोटीचा विमा मिळण्यासाठी दुसऱ्याच व्यक्तीचा केला खून. स्वतः मृत झाल्याचा केला बनाव, आरोपीस केले जेजुरी येथून अटक

74
Adv

वाठार स्टेशन,पुसेगाव,लोणंद पोलिसांची संयुक्त कारवाई.
पिंपोडे बुद्रुक : ( प्रतिनिधी ) वाठार पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणार्‍या बोधेवाडी घाटात दिनांक 21 जानेवारी 2020 रोजी कार सह एक अर्धनग्न मृतदेह जाळून मारण्यात आला होता. आणि तो मृतदेह सुमित मोरेचा असल्याचा बनाव करण्यात आला होता. परंतु सदरचा अर्धवट जळालेला मृतदेह सुमित मोरे याचा नसून उकीर्डे ता.माण येथील त्याच्या सारखा दिसणारा व त्याच्या वयाचा, त्याच्यासारख्या शरीर बांधणीचा तानाजी बाबा आवळे याचा आहे.

पोलिसांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार सुमीत मोरे याने आयसीआय बँकेकडून दीड कोटीचा स्वतःचा विमा उतरवला होता. आणि तो मुंबई येथे प्रोटींनचा व्यवसाय करीत होता व्यवसाया मध्ये त्याचे नुकसान झाले होते आणि कर्जबाजारी झाला होता नुकसान व कर्ज भागवण्यासाठी स्वतःचा विमा मिळवण्यासाठी अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. व विम्याचे पैसे मिळवून पलायन करण्याचा त्याचा हेतू होता. अशातच त्याच्या जाळ्यात त्याच्यासारखा दिसणारा त्याच्या शरीरयष्टीचा युवक तानाजी बाबा आवळे रा.उकिरडे ता. माण याला दहिवडी येथे बोलवून घेतले व बोधेवाडी येथील घाटमाथ्यावर त्याला मारहाण करून त्याला पेट्रोल टाकून अर्धनग्न करून जाळण्यात आले व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. खून झाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते तसेच धीरज पाटील, तसेच सुहास गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री स्वप्नील घोंगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दहिवडी येथे तळ ठोकून संशयितांची चौकशी करून मयत सुमित मोरे जिवंत असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे संयुक्त पथक बनवून आरोपीस जेजुरी येथे अटक करण्यात आले. सदरच्या या कारवाईमध्ये पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री घोडके साहेब तसेच लोणंद येथील पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. आरोपीस अटक करून या गुन्ह्यामध्ये आणखी काही संशयित असल्याचा तपास वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री घोंगडे साहेब करीत आहेत.

Adv