सातारा पालिकेच्या कमानी हौदा समोरील पार्किंग मध्ये विद्यार्थी व काही युवकांकडून खुलेआम सिगरेट ओढण्याचा कार्यक्रम चालू असतो
राजवाडा ते नगर पलिका या रस्त्यावरून शेकडो नागरिकांची ये जा चालू असते कमानी हौदा समोरील पालिकेच्या पार्किंग मध्ये दिवसाढवळ्या विद्यार्थी व काही युवकांचा येथे सिगरेट ओडण्याचा कार्यक्रम ठरलेलाच असतो या धुरामुळे शेजारील नागरिक वैतागले असून पालिकेने यावर ठोस उपाय करून हा प्रकार बंद करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे
दुर्दैवाची बाब म्हणजे येथे शाळेतील व कॉलेज मधील युवक प्रचंड प्रमाणात व्यसनाधीन झाल्याचे दिसतात आपल्या मुलाकडे पालकांचे लक्ष नाही का असे दिसते पार्किंगवरून हाकेच्या अंतरावरच एक कॉलेज ,शाळा व क्लास आहे तसेच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनाही या धुराचा सामना करावा लागतो लवकरच यावर निर्णय घेऊन हा प्रकार बंद करणार असल्याचे नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे यांनी यावेळी सांगितले