आधी नमस्कार नंतर दिला खुलास गप्पा श्री छ उदयनराजे – रामराजे यांच्या भेटीची सुखद राजकीय चर्चा

152
Adv

सातारा जिल्हयाच्या राजकारणात एकमेकांशी राजकीय वितुष्ट असणारे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शनिवारी चक्क एकमेकांना नमस्कार करत दिलखुलास गप्पा मारल्या . हा दुर्मिळ योग साताऱ्याच्या शासकीय विश्रामगृहात जुळून आला विधान परिषदेचे सभापती रामराजे व भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या भेटीची जिल्हयाच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली .

लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्यात झालेल्या जोरदार राजकीय शेरेबाजीमुळे चांगलेच वितुष्ट आले होते दोन राजघराण्यातील विसंवादाची संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती . काही वेळा दोन्ही राजे साताऱ्यातील विश्रामगृहातच आमनेसामने आले होते तेव्हा तो राजकीय ताणं सांभाळताना पोलिसांची प्रचंड कसरत झाली होती .

शनिवारी संध्याकाळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सायंकाळी एका बैठकीच्या निमित्ताने शासकीय विश्रामगृहात पोहचले . तेव्हा तेथील कक्ष क्रमांक एकमध्ये विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आधीपासूनच उपस्थित होते . राजकारणात कधीच कोणी कायमस्वरूपी शत्रू नसतो मतभेद हे तत्कालिक असतात हेच उभयतांच्या भेटीवरून स्पष्ट झाले . दोन्ही राजेंची भेट योगायोगाने झाली त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही .

केवळ एकमेकांनी एकमेकांच्या तब्ब्येतीची चौकशी करून काळजी घ्या असे सांगितल्याचे दोन्ही राजेंच्या सामाईक स्नेही मंडळींनी सांगितले . सभापती रामराजे , खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या अनौपचारिक भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली . राजकीय पंडितांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केले . कितीही विसंवाद झाला तरी राजशिष्टाचाराचे संकेत दोन्ही राजेंनी मात्र आवर्जून पाळल्याचे दिसून आले .

Adv