सन २०/२१ ची घरपट्टी भरणाऱ्याना येत्या आर्थिक वर्षात ३ महिन्यांची घरपट्टी माफ करण्याचा लाभ दिला जाईल अशी व्यवस्था करणार

56
Adv

एप्रील ते जुन २०२० या पहिल्या तिमाहीत राज्य व केंद्र शासनाने महाराष्ट्रात आणि देशात संपूर्ण लॉकडाउन जाहिर केला होता. लॉकडाउन मध्ये सर्वच व्यवहार बंद होते. कोणतीच व्यावयायिक हालचाल नव्हती त्यामुळे या लॉकडाउन काळातील व्यापारी वर्गाच्या व्यावसायिक मिळकतीची किमान तीन महिन्यांच्या घरपटटीमध्ये कायदयानुसार मिळकतकर माफी देण्याबाबत, नगरपरिषदेच्या स्तरावर तातडीने निर्णय घेण्याबाबत नगरपरिषदेला सूचना दिली आहेत. जे व्यापारी सन २०२०-२१ ची घरपटटी रक्कम थकबाकीसह भरतील किंवा ज्यांनी भरली असेल त्याना पुढील आर्थिक वर्षात तीन महिन्याच्या व्यावसायिक घरपटटीची रक्कम माफ करणेचा लाभ दिला जाईल अशी व्यवस्था करणेबाबत नगरपरिषदेला सूचना दिलेल्या आहेत अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

याबाबत जलमंदिर पॅलेस मधुन देण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे की, कोरोना महामारीमुळे, एप्रील २०२० ते जुन २०२० अखेर पूर्णपणे लॉकडाउन असलेल्या कालावधीत व्यापारी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्यांनी भाडयाने गाळे घेवून व्यवसायामधुन आर्थिक उन्नती करण्याचे नियोजन केले होते, त्यांचेतर कंबरडेच मोडले आहे. व्यापारी व्यावसायिक हा त्या त्या क्षेत्राच्या विकासाचा केंद्रबिंदु असतो, व्यापा-यांच्या व्यावससायिक धाडसामुळेच एकंदरीत चलन-वलनामध्ये फार मोठी उलाढाल होवून, त्या त्या क्षेत्राचा विकास होत असतो. छोटया मोठया व्यावसायिक कारणांमुळे हातावरचे पोट असणा-या व्यक्तींना रोजगार मिळत असतो. त्यामुळेच व्यापारी-व्यावसायिक नागरीक्षेत्राचा कणा समजला जातो अशी आमची धारणा आहे. म्हणूनच जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी राजा ज्या प्रमाणे जगला पाहीजे त्याप्रमाणे व्यापारी तरला पाहीजे तरच समाज टिकेल अशी आमची धारणा आहे. या शतकातील सर्वांत मोठी महामारी असलेल्या कोरोनाच्या रुपाने गेल्या ७-८ महिन्यांपासून सर्वांचेच आर्थिक,मानसिक,सामाजिक,शाररिक खच्चीकरण होत असल्याचे दिसत आहे. त्यामध्ये व्यापारी-व्यावसायिक पूर्णपणे भरडले गेले आहेत.

त्यामुळेच ज्यांचे व्यवसायच शासकीय लॉकडाउन असल्यामुळे सुरु ठेवणे शक्यच नव्हते, त्यांना त्या काळात घरपटटीमध्ये सूट देवून दिलासा दिला पाहीजे या भावनेतुन सातारा नगरपरिषदेच्या हददीतील व्यावसायिक मिळकतींच्या घरपटटीमध्ये एप्रील २०२० ते जुन २०२० अखेरच्या तीन महिन्यांच्या काळातील घरपटटी माफ करणेबाबत धोरणात्मक निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे जरुर त्या अटीशर्तीसह करावी अश्या सूचना नगरपरिषदेच्या प्रशासनास दिल्या आहेत. व्यापारी बंधुंना त्यांच्या अडचणीच्या काळात नगरपरिषदेच्या माध्यमातुन हा एक दिलासा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकात स्पष्ट केले आहे.

Adv