सातारा पालिकेच्या प्रशासकीय रचनेत बदल करण्यात आले असून राज्य संवर्ग अधिकाऱ्यांच्या खाते अंर्तगत बदल्या करण्यात आल्या आहेत . मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी याबाबतचे आदेश बुधवारी जाहीर केले .
आस्थापना विभागातून अरविंद दामले यांची कार्यालयीन अधीक्षक पदी नेमणूक करण्यात आली असून वसुली विभागाचाही त्यांच्याकडे चार्ज देण्यात आला आहे .मिळकत व्यवस्थापक पदावरून प्रशांत खटावकर यांना आस्थापना विभागात प्रमुख म्हणून नेमणूक देण्यात आली आहे . प्रणिता शेंडगे यांची कार्यालय अधीक्षक पदावरून स्थावर जिंदगी विभागावर वर्णी लागली आहे . प्रणव पवार यांच्याकडील वाहतूक विभागाचा चार्ज आता अग्नीशमनं वाहतूक निरीक्षक सौरभ साळुंखे यांच्याकडे देण्यात आला आहे . विश्वास गोसावी यांनी निवडणूक शाखेसह स्थावर जिंदगी विभागाच्या लिपिक पदाची जवाबदारी देण्यात आली आहे .
मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी याचे लेखी आदेश बजावल्यानंतर संबधितांना नियुक्त जागी कार्यभार स्वीकारण्या संदर्भात सूचित करण्यात आले आहेत . या बदल्या प्रशासकीय कारणासाठी करण्यात आल्याचे मुख्याधिकारी बापट यांनी स्पष्ट केले .