सातारा पालिकेच्या लेखापाल पदी आरती नांगरे

59
Adv

सातारा पालिकेच्या लेखापाल पदाची सूत्रे आरती नांगरे यांनी बुधवारी स्वीकारली . नांगरे या सहाय्यक संचालक संवर्गातून थेट नियुक्त झाल्याने लेखा विभागात त्यांची स्वाक्षरी आता अंतिम असणार आहे .

बुधवारी दुपारी साडेबारा वाजता आरती नांगरे या पालिकेत हजर झाल्या . मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्याशी चर्चा करून त्यांनी हिंमत पाटील यांच्याकडून तत्काळ पदभार स्वीकारला आणि ताबडतोब कामाला सुरवातही केली .

20 मार्च 2019 च्या शासन निर्णयाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थाचे आर्थिक बळकटीकरण व वस्तुतः लेखापरीक्षण याकरिता सहाय्यक संचालक संवर्गातील वित्त विभाग वर्ग -१ चा अधिकारी नेमण्याचा निर्णय झाला होता . अमिता नांगरे या गेल्या वर्षीच पालिकेत हजर झाल्या होत्या . मात्र घरगुती कारणामुळे त्या लगेच दीर्घ मुदतीच्या रजेवर गेल्या . मात्र बुधवारी त्यांनी पालिकेत हजर होऊन लेखा विभागाचा कार्यभार सांभाळला . आरती नांगरे या मूळच्या मसूर ता कराड येथील असल्याने जिल्ह्याची त्यांना चांगलीच ओळख आहे . गोंदिया येथे जिल्हा परिषदेत त्यांनी डेप्युटी कॅफो म्हणून दोन वर्ष सेवा बजावली आहे . त्यानंतर सातारा पालिकेतील हे त्यांचे दुसरेच पोस्टिंग आहे . घरपट्टीच्या माफीचा सर्वसाधारण सभेतील येऊ घातलेला ठराव, तब्बल तीन कोटीची रखडलेली देयके, पालिकेचे घटलेले उत्पन्न, याच्या ताळेबंदाला वित्तिय शिस्त लावण्याचे आवाहन नांगरे यांच्या पुढे आहे .

Adv