सातारा पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी नगरसेवक मनोज शेंडे यांच्या निवडीची औपचारिकता बाकी आहे . गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या ऑन लाईन सभेमध्ये या निवडीवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे .
शेंडे यांच्या निवडीची सातारानामा कडे पक्की खबर असताना अकलेचे अर्धवट दिवे पाजळणाऱ्या काही महाभागांनी या निवडीत आणखी काही नगरसेवकांची नावे जोडून या निवड प्रक्रियेचा ट्विस्ट वाढविला आहे . सातारा विकास आघाडीच्या गोटात गेल्या पाच वर्षात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नगरसेवक राजू भोसले , सुहास राजे शिर्के, किशोर शिंदे यांना उपनगराध्यक्ष पदी कामाची संधी दिली या तिन्ही उपनगराध्यक्ष यांनी उत्तम कामगिरी केली त्यामुळे शेवटच्या अकरा महिन्याच्या महत्वपूर्ण टर्मसाठी करोना संक्रमणाच्या काळात वॉर्डातील नागरिकांसाठी मोठे मदतकार्य उभे करणाऱ्या मनोज शेंडे यांचेच नाव नैसर्गिक रित्या पहिल्या पासून आघाडीवर होते . नगराध्यक्षांशी कामाचा उत्तम समन्वयं ठेवणारा उपनगराध्यक्ष खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना निवडायचा आहे .
शेंडे यांच्याकडे कामाची विशिष्ट गती असून कोणत्याही अपेक्षेशिवाय ते सतत एकनिष्ठपणे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या आदेशाशी बांधिल राहिले . या स्पर्धेतील दुसरे निष्ठावंत नाव म्हणजे नगरसेवक श्रीकांत आंबेकर . आंबेकर यांना यापूर्वी सुद्धा पाणी पुरवठा सभापती संधी दिली होती . ज्यांना आत्तापर्यंत संधी मिळाली नाही त्यांना पुढे आणण्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या राजकारणाचे सूत्र आहे . राजेंचे दोन्ही शिलेदार कट्टर असले तरी कधीही राजकीय कारणासाठी चर्चेत नसणाऱ्या मनोज शेंडे यांच्या नावाचाच विचार क्रमप्राप्त असून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांचीही या नावाला मूक पसंती आहे . मात्र खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांचे समयसूचक राजकारण असल्याने उपनगराध्यक्ष पदाचा सस्पेन्स शेवटच्या क्षणापर्यंत कायम असतो गुरुवारी होणाऱ्या निवडीतही असाच सस्पेन्स खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी ठेवला आहे
. मात्र प्रत्येक घटनेला सोयीस्कर वळणं देऊन आपले महत्वं वाढविण्याच्या नादात पालिकेच्या वर्तुळात अर्धवट अकलेचे तारे तोडणारी काही मंडळी बोकाळली आहेत . उगाच निवड प्रक्रियेला राजकीय उकळी आणून त्यावर आपला व्यापारी स्वार्थ साधण्यासाठी पडद्याआडून उलटसुलट जोरदार पेरणी झाली मात्र हा राजकीय व्यापार लोकांची मते लक्षात न घेताच करण्यात आला . काही मंडळी कधी पालिकेची पायरी न चढता जर तरच्या ठोकताळ्यावर मथळे रंगवित असतील तर त्यांनी स्वतःच्या वरच्या मजल्यावर काही शिल्लक आहे का ? याची तपासणी करायला हवी . सातारा शहराचे प्रवेशद्वार समजले जाणाऱ्या करंजे गावठाणावर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांची विशेष मर्जी आहे . हद्दवाढीमुळे करंजे ग्रामीण भागही शहराला जोडला गेला आहे . या भागात राजकीय मोर्चे बांधणी करण्यासाठी नगरसेवक मनोज शेंडे यांनाच संधी मिळणार असल्याचा राजकीय धुरिणांचा स्पष्ट हवाला आहे
. हा हवाला करंजे ग्रामस्थांच्या लोक मतांच्या सर्वेक्षणावर अवलंबून आहे मात्र श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी करंजे च्या राजकीय अस्मितेला डावलण्याचा झालेला प्रयत्न अककल घरी ठेऊन उगाच डोक्याला शीणं देण्याचा पोकळ प्रयत्न असल्याचा उपरोधिक सल्ला साताऱ्यातील राजकीय पंडितांनी दिला आहे . सातारकरांच्या स्पंदनाची अचूक नाळं सातारानामा शी जोडलेली आहे . उपनगराध्यक्ष पदी मनोज शेंडेच असणार ही बाब सोळां आणे सत्य आहे . मात्र काही पत्र पंडितांनी या निवड प्रक्रियेच्या निमित्ताने जी अक्कल पाजळली आहे त्याचे साताऱ्याच्या चौका चौकात हसे होत आहे .
चौकट
खा श्री छ उदयनराजे साताऱ्यातच
साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे गेल्या काही दिवसापासून सातार्यात असून आपल्या जलमंदिर येथून शेकडो नागरिकांचे प्रश्न सोडवत आहेत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे सातारयातच असून होणाऱ्या उपनगराध्यक्ष निवडी वेळी ते उपस्थित राहतील अशी अपेक्षा नगरसेवक मनोज शेंडे यांच्या समर्थकांमध्ये आहे