खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने नुकताच निकाल लागलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा परीक्षांमध्ये दैदीप्यमान यश मिळवलेल्या सातारा जिल्ह्यातील एकूण तीस यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जलमंदिर पॅलेस येथील दरबार हॉलमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळून आयोजित करण्यात आला होता
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेली निवड म्हणजे तुमच्या प्रयत्नांना मिळाले यश तुमच्या पालकांची पुण्याई आणि समाजाचे नशीब समजून पुढील प्रशासकीय नोकरीच्या माध्यमातून जनतेचे अविरत सेवा करावी तुम्हाला काहीही समस्या प्रश्न निर्माण झाले तर आम्ही सदैव सहकार्य करता तत्पर आहोत जलमंदिर हे जनतेचे घर आहे सर्वसामान्यान मुळे आमचे राजे पण आहे जनतेसह तुम्हा सर्वांना जलमंदिर सदैव खुले आहे असे मार्मिक गौरवद्वार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केले
दरबार हॉल येथे सत्काराच्या निमित्ताने उत्साहपूर्ण वातावरणात होते अनेक यशस्वी विद्यार्थ्यांना जलमंदिर पॅलेस हे महाराज साहेब यांचे निवासस्थान पाहण्याचा मोह आवरता आला नाही संपूर्ण कार्यक्रमाच्या दरम्यान उदयनराजे भोसले यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने हितगुज केले आणि दिलखुलास गप्पा मारल्या