आरोग्य निरीक्षक कायगुडे यांच्या वर कारवाई करा राम हादगे

44
Adv

कवारंटाईन चा भंग केल्याप्रकरणी सातारा विकास आघाडीच्या नगरसेविका सीता हादगे यांचे पती राम हादगे यांनी आरोग्य निरीक्षक कायगुडे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे

सदर तक्रारी मध्ये सातारा पालिकेचे आरोग्य निरीक्षक कायगुडे हे शासनाची कोणतीही परवानगी न घेता परदेशी गेले होते ते 13 3 2020 रोजी ते परत आले कोरोना सारख्या भयंकर महामारी ने जगाला नुकोसे केले आहे त्यातच हे महाशय आरोग्य निरीक्षक असल्याचे विसरूनच गेले लक्ष्मी दर्शनाच्या नादात काव काव करत ते सातारा पालिकेत अवतरले लक्ष्मी दर्शनाच्या नादात त्यांना कळले नाही की आपण कवारंटाईन चा भंग करतोय या सर्व गोष्टीवर पालिकेचे प्रशासनाचे मुख्य अधिकारी गोरे साहेब मात्र हातावर घडी तोंडावर बोट अशाच भूमिकेत दिसत आहेत

आता दस्तुरखुद्द सातारा विकास आघाडीच्या नगरसेविका यांच्या पतीनेच तक्रार केली आहे या तक्रारीला कितपत प्रतिसाद मिळतोय का एका मंत्र्याच्या गृह संबंधामुळे त्यालाही कोलदांडा मिळतोय सातारा पालिकेत सत्ता असलेल्या श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची सातारा विकास आघाडी यावर कारवाई करण्याचे धाडस दाखविले हे खरे बघण्याचे उत्सुकतेचे असेल

Adv