कन्हेर योजनेसाठी खा श्री छ उदयनराजे यांच्या प्रयत्नातून आणखी बारा कोटीचा वाढीव निधी मंजूर

112
Adv

शाहुपूरी कण्हेर पाणीपुरवठा उपाययोजनेमधुन शाहुपूरीकरीता ४५०० कनेक्शन्स मंजूर करण्यात आली असली तरी सुमारे १२ कोटी वाढीव निधी मंजूर करवून घेतला असल्यामुळे, त्यापेक्षा जास्त कनेक्शनची गरज भासल्यास, सर्वांना कनेक्शन्स देण्याची कार्यवाही एमजेपीकडून केली जावी, कनेक्शनकरीता कोणाची अडवणुक होता कामा नये, काही समस्या असल्यास आमच्याशी संपर्क साधावा त्यातुन योग्य तो मार्ग काढला जाईल, अश्या स्पष्ट सूचना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता श्री.भुजबळ यांचेसह स्थानिक अधिका-यांना दिल्या.

मुख्य अभियंता श्री.भुजबळ यांना खा श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बोलावून घेवून शाहुपूरी कण्हेर पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेताना या सूचना दिल्या. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, शाहुपूरी गटाचे माजी सदस्य संजय पाटील, काका धुमाळ, खासदार उदयनराजे भोसले यांचे खाजगी सचिव जितेंद्र खानविलकर, एमजेपीच्या सातारा कार्यालयाच्या उपकार्यकारी अभियंता कु.चौगुले,आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता.नागरी योजना आणि त्यातल्या त्यात पाणीपुरवठा योजना या नागरीकांना सुविधा देण्यासाठी असतात, त्यामुळेच नागरी पाणीपुरवठा योजनांचा लाभ देताना कोणताही भेदभाव केला जावु नये अशी सर्वमान्य धारणा आहे. शाहुपूरीचा भाग आता नगरपरिषदेच्या हददीत समाविष्ट झाला आहे.त्यामुळे वाढीव कनेक्शन्स देण्याची पुढील कार्यवाही एमजेपी आणि नगरपरिषद यांचे माध्यमातुन करण्यात यावे. शाहुपूरीमधील कोणत्याही कुटुंबाची पाण्याच्या कनेक्शन अभावी अडचण निर्माण होईल असे कोणतेही कृत्य होणार नाही याची काळजी एमजेपी आणि नगरपरिषदेने घ्यावी. या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करुन, योजनेचा लाभ देण्यास लवकरात लवकर सुरुवात करावीअसे देखिल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एमजेपीच्या अधिका-यांना स्पष्ट केले.

मुख्य अभियंता यांनी याबाबत लवकरच योग्य ती कार्यवाही करुन, नगरपरिषदेच्या सहकार्याने योजना लवकरच
कार्यान्वित करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी दिली.

Adv