करोनाच्या महामारीत गुडगुडी बाबा टक्केवारीच्या घोळात काम नावाला आणि रूबाब गावाला मुख्याधिकाऱ्यांच्या कामाविषयी तीव्र संताप

62
Adv

अख्खा सातारा कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर झाला आहे तिथे काही जणांची टक्केवारीची उबळ अजूनही गेलेली नाही . गृहराज्यमंत्र्यापुढे कामाचा आव आणणारे प्रशासनातले नमुने अजूनही कागदी घोडे नाचवत असल्याने करोनाशी खऱ्या अर्थाने झुंजणाऱ्याची कोंडी होऊ लागली आहे .

गुडगुडी बाबाच्या वादग्रस्त दुबई वारीची धूळ आता खाली बसू लागली आहे . ती धूळ मॅनेज करण्यात मुख्याधिकारी शंकर गोरे यांचा फार मोठा वाटा आहे .गोरेंचे प्रशासकीय मॅनेजमेंट आणि त्याचे आराखडे त्यांच्या डायरीत असतात , सध्या साहेबांनी करोनाची इतकी भीती घेतली आहे की आपल्या डायरीला सुध्दा ते शिपायाला हात लावून देत नाहीत खुर्चीत बसून त्यांनी कंटेनमेंट सातारा झोनचा कारभार चालवला आहे . मात्र गुडगुडी बाबाला सातत्याने वादग्रस्त ठरूनही कोणतीही विशेष जवाबदारी देण्यात आली नाही . बाबांचा एक डोळा सतत खजिना विभागावर लक्ष ठेवून असतो . इथे टक्केवारी आणि वाटप सारे काही ‘ विवेका ‘ ने चालते . इथे पाच टकक्यांची विवेकबुद्धी कोणाच्या व्यवस्थेसाठी वापरली जाते . म्हणूनच कमिटी हॉलच्या बंद दरवाजा मागे नक्की काय कामे चालतात हे कोणालाच समजून दिले जात नाही . सध्या 1 कोटी 95 लाखांचे अनुदान चालू महिन्यासाठी पालिकेला प्राप्त झाले आहे .व वित्त आयोगाचे दरवाजेसुद्धा करोना प्रतिबंधासाठी खुले आहेत .

त्यामुळे कंटेनमेंट झोनच्या आरोग्य तपासणीत गुडगुडी बाबा हातात थर्मल स्कॅनर घेऊन फोटो सेशन करतात मात्र मिळणाऱ्या बिलांची टक्केवारी आणि त्याचे वाटप हा खरा कलमी कार्यक्रम असतो . या वाटपाच्या कार्यक्रमातही आपण किती धुतले तांदूळ आहोत याचा हवाला गुडगुडी बाबा त्यांच्या अधिकाऱ्यांना देतात . साहेब तुम्ही हजर झाल्याशिवाय कोणतेही वाटप होणार नाही असे पावशेर ठेवत ते साहेबालाच दमात घेण्याचा प्रयत्न करतात . इथे राज्य संवर्ग सुध्दा विलक्षण चटावलेला बनल्याने सगळेच लक्ष्मी दर्शन सोयीस्करपणे सुरू आहे . या चौकटीतल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग पालिकेत वाजायला लागल्यावर भल्याभल्यांच्या झोपा उडतात . आपली नैतिकता व सचोटी कोणी व किती टकक्यात गहाणं ठेवली याचे ते संभाषणं असल्याने या कोरोना वॉरियर विषयी असणारा आदर गळून पडतो . सातारकरांच्या पैशांवर तुंबडी भरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची राणा भीमदेवी थाटातील गर्जना काही नगरसेवक करतात . पण अधिकारी व पदाधिकारी ह एकाच थाळीचे चट्टेबट्टे आहेत . यामध्ये गुडगुडी बाबा कळीचा नारद आहे आणि या नारदाच्या नारायणाला बारामतीला जायची स्वप्ने पडत आहेत . मुख्याधिकारी गोरेंनी मध्यंतरी नोटीस बजावण्याचे नाटक खुबसुरत वठवले त्याचा खुलासा गुडगुडी बाबाने ब्लॅक डॉगच्या पेगमध्ये बुडवून ठेवला ( अर्थात हा स्टॉक लॉक डाऊनच्या आधीचा आहे . उगाच शंका नको )

कालच गृहराज्यमंत्री सगळा राजकीय प्रोटोकॉल बाजूला ठेऊन चक्क यामाहा दुचाकीवर पालिकेत हजर झाले . त्याची खरी गरज प्रत्यक्ष तिथे मराठवाडयात वाशिम जिल्हयात आहे आता हेच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कानात सांगण्याची वेळ आली आहे . असो उगाच राजकीय शिष्टाचार मोडायला नको . गृहराज्यमंत्र्यापुढे नारद- आणि नारायणाने साताऱ्यातील लागू उपाययोजनांची पोपटपंची केली . तेव्हा ते सुध्दा खुश झाले .
करोना साठी तळागाळात जीव धोक्यात घालणारा कर्मचारी सुविधांसाठी तडफडतो आहे आणि इकडे गुडगुडी बाबाला अजूनही टक्केवारीची उबळ येते , ती कशी ? तर पालिकेच्या सोलापूरच्या ठेकेदाराला फोन करून नक्की विचारा .

Adv