शिवकालीन ओढ्या प्रकरणी बांधकाम विभागाचे कानावर हात

85
Adv

समर्थ मंदिर येथील ऐतिहासिक शिवकालीन याप्रकरणी बांधकाम विभागाचे कानावर हात असून नक्कीच पाटील भाऊंना लक्ष्मी दर्शन झाल्याची चर्चा आज पालिकेत होती

मराठ्यांची राजधानी म्हणून साताऱ्याची ओळख आहे राजधानीतील ऐतिहासिक शिवकालीन ओढा मुजवण्याचे काम पालिकेचा ऐतिहासिक बांधकाम विभाग करत असून याप्रकरणी संबंधित नगरसेविका प्राची शहाने यांचे पती शहाने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना काहीही उत्तर देता आले नाही प्रभागातील प्रश्नाचे उत्तर नसेल तर हे दुर्दैव म्हणावे लागेल

बांधकाम सभापती तर मिस्टर इंडिया च्या भूमिकेत आहेत छत्रपतींच्या शहरात असे शिवकालीन ओढे नामशेष होत असतील तर यासारखे दुर्दैव सातारा शहरातील नागरिकांचे नाही बांधकाम चे इंजिनियर शिंदे साहेब तर चक्क म्हणालेत कि या ओढ्याला िल्हाधिकार्‍यांची परवानगी आहे शिंदे साहेब सातारा शहरातील ओढयांची कामे किती बंद आहेत याची सविस्तर माहिती आपल्याच बांधकाम विभागात आहे जरा फाईल चाळून पहा जोपर्यंत या पुलाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत सातारानामा पाठ पुरवठा नक्कीच करेल

क्रमश

Adv