कोरणा हा महाभयंकर आजार होऊच नये याकरता सातारा शहराचे पूर्णपणे नियोजनबद्ध आराखडा पालिका प्रशासनाने तयार केला होता अगदी हात धुण्याचे प्रशिक्षण ही कर्मचाऱ्यांना देत आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांनी पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची काळजी घेतली संपूर्ण शहर दोन वेळा निर्जंतुकीकरण करण्यात आले ज्या शहरात 22 रुग्ण आढळून आले त्यापैकी एकही स्थानिक नव्हते बाहेरच्यांवर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक वॉर्डात कमिटी गठित केल्या होत्या त्याच्या रणनीतीला यश आले असेच म्हणावे लागेल असे मत आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांनी सातारानामाशी बोलताना सांगितले
कोरोनाला अटकाव करण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्ष माधवी कदम उपनगराध्यक्ष किशोर शिंदे सर्व पदाधिकारी व नगरसेवक यांच्या सहकार्याने करोणाला शहरात थारा देता आला नाही अजूनही आगामी काळातील करोणाचे संकट टळले नाही सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरणा बाधित रुग्णांची संख्या कमालीची वाढ होत आहे त्यामुळे आगामी कालावधीत शहरातील प्रत्येक नागरिकांनी स्वतःची काळजी स्वता घेणे गरजेचे आहे असे मत ही आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांनी यावेळी व्यक्त केले
सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाने तत्परतेने शहरातील स्वच्छतेचा अनुषंगाने योग्य प्रकारची काळजी घेतली असून शहरातील सर्वच अंतर्गत नालेसफाई केली जात आहे तसेच शहरात प्रत्येक भागात तयार होणारा कचरा गोळा करून सोनगाव कचरा डेपोत टाकण्यात येतो सर्व प्रभाग स्वच्छ करण्यात आले असल्याचे आरोग्य सभापती घोरपडे यांनी यावेळी सातारानामाशी बोलताना सांगितले
पालिकेतील प्रत्येक कर्मचाऱ्यांची करोणाच्या अनुषंगाने काळजी घेतली जात आहे शहराच्या सुरक्षेसाठी अधिकारी व 450 कर्मचारी कष्ट घेत असतात त्या सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याचेही सभापती घोरपडे यांनी यावेळी सांगितले