औषधाविना रुग्ण दगावू नये याची काळजी घ्या आ. शिवेंद्रसिंहराजे; मेढा रुग्णालयात कोव्हीड केअर सेंटर सुरु

116
Adv

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जावली तालुक्यातही बाधीतांची सं‘या वाढत असून रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत आणि रुग्ण बरे व्हावेत यासाठी प्रशासनासह सर्वचजण प्रयत्न करत आहेत. मेढा ग‘ामीण रुग्णालयात ३० बेडचे कोव्हीड केअर सेंटर सुरु करण्यात आले असून माझ्या कुटूंबाच्यावतीने रुग्णसेवेसाठी डिजीटल एक्सरे मशीन या रुग्णालयास भेट दिले आहे. रुग्णांसाठी आवश्यक असणारी इंजेक्शन्स प्रशासनाने या रुग्णालयास उपलब्ध करुन द्यावीत. इंजेक्शन आणि औषधाविना रुग्ण दगावू नये, याची काळजी रुग्णालय प्रशासनाने घ्यावी, असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

मेढा ग‘ामीण रुग्णालय येथे ३० बेडचे कोव्हीड केअर सेंटर प्रशासनाकडून सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, या सेंटरसाठी प्रशासनाला डिजीटल एक्सरे मशीन घेणेसाठी निधी उपलब्ध होत नव्हता. ही बाब समजल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कुटूंबाच्यावतीने डिजीटल एक्सरे मशीन या रुग्णालयास भेट दिली. या कोव्हीड केअर सेंटरच्या शुभारंभप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी मिनाज मु‘ा, तहसीलदार शरद पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, नगराध्यक्ष अनिल शिंदे, उपनगराध्यक्ष दत्ता पवार, माजी बांधकाम सभापती विकास देशपांडे, तालुका आरोग्य अधिकारी भगवान मोहिते, गटविकास अधिकारी सतीश बुध्दे, वैद्यकीय अधिक्षक चंद्रकांत यादव, डॉ. सुतार, डॉ. पारेकर, डॉ. यादव, ङ्गार्माशिस्ट गायवाकड आदी उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, जिल्हा प्रशासनावर ङ्गार मोठा ताण आहे. तीही आपल्यासारखी माणसं आहेत. त्यांनाही कुटूंब, मुलंबाळं आहेत याचे भान ठेवून सर्वांनीच प्रशासनाच्या सुचनांच पालन करुन त्यांना सहकार्य केले पाहिजे. जिल्हा रुग्णालय, खासगी रुग्णालये यांची बेड क्षमता मर्यादीत आहे. त्यामुळे सातार्‍यात पुष्कर मंगल कार्यालयात माझ्या कुटूंबाच्यावतीने ८२ बेडचे कोव्हीड केअर सेंटर सुरु केले. आज मेढा रुग्णालयात ३० बेडचे सेंटर सुरु झाले आहे. त्यासाठी एक्स रे मशीन उपलब्ध होत नव्हती किंवा निधी मिळत नव्हता. या सेंटरसाठी माझ्या कुटूंबाच्यावतीने रुग्णसेवेसाठी एक्स रे मशीन भेट दिली. अनेकांनी या सेंटरसाठी मदत केली आहे. सातारा, जावली असा दुजाभाव मी कधीही केला नाही. जावली तालुका हा दुर्गम डोंगराळ आहे. मेढा हे तालुक्याचे ठिकाण असून याठिकाणी तालुक्याच्या कानाकोपर्‍यातून रुग्ण उपचारासाठी येतात. सर्वांवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे सेंटर चालू झाले पण इथे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांची उणीव भासू देवू नका, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रशासनाला सुचीत केले.
या सेंटरसाठी इंजेक्शन आणि आवश्यक औषधे उपलब्ध करुन द्या. सातार्‍याहून आणण्यासाठी वेळ जातो. इंजेक्शन आणि औषध नाही म्हणून रुग्ण दगावला असे प्रकार होवू नयेत याची काळजी आरोग्य विभागाने घ्यावी, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. बाधीत रुग्णांसाठी उपचाराची पध्दत काय आहे, हे सर्वांना समजले आहे. व्हेंटीलेटर पेक्षा ऑक्सिजन मिळणे आवश्यक असते. व्हेंटीलेटर हा ङ्गक्त अती गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असतो हे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे लोकांनी घाबरु नये. पण काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा आणि विनाकारण बाहेर ङ्गिरटे टाळावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.

डॉ. चव्हाण म्हणाले, कोरोना बाधीत रुग्णांसाठी ऑक्सिजन महात्वाचा आहे. व्हेंटीलेटर हा एकदम चिंताजनक रुग्णांसाठी लागतो. ऑक्सिजन युक्त बेडची कमतरता भासत होती. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वत: पुढाकार घेवून ८२ बेडचे सेंटर सुरु करुन दिले. जिल्ह्यातील हेे पहिले सेंटर असून अशा पध्दतीने सेंटरर्स सुरु झाली तर रुग्णांवर उपचार करणे सोपे होणार आहे.
प्रांताधिकारी मु‘ा म्हणाले की, जावली तालुक्यातील प्रशासकीय टीम एक नंबर आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी टीम अहोरात्र झटत आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी याठिकाणी एक्स रे मशीन दिल्याने कोरोना आणि निमोनियाचे निदान करणे सोपे झाले असून रुग्णांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. योग्य पध्दतीने काम झाल्यास आगामी काळात कोरोनाची साथ आटोक्यात येईल आणि दिवाळीचा सण सर्वजण आनंदात साजरा करतील, अशी आशा मु‘ा यांनी व्यक्त केली.
पानसरे यांनी सुत्रसंचालन केले. राजेंद्र जाधव यांनी आभार मानले. यावेळी सर्व नगरसेवक, रुग्णालय समितीचे सदस्य आणि रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Adv