सातारा जिल्हा परिषदच्या मुख्य इमारती शेजारील अतिक्रमण असलेले दुकान एका शासकीय योजने मधील एका केंद्राची छोटी इमारत असून ती योजना बंद पडून अनेक वर्षे झाली असताना ही त्याचा वापर कोणत्या ही शासकीय पुर्व परवानगी शिवाय दुकान गाळ्याच्या रुपात गेली अनेक वर्षे सुरु आहे.
यामुळे रहदरिच्या मुख्य रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी होत असून नागरिकामधे किरकोळ वादवादीचे प्रकार सुद्धा घडत आहेत. तरी संबंधित अतिक्रमित झेरॉक्स सेंटर तात्काळ बंद करण्यात यावे आणि नागरिकांची होणारी गैरसोय टाळन्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किरण खरात यांनी केली आहे,
या निवेदनच्या प्रति मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा व मा.जिल्हाधिकारी सातारा यांना देण्यात आल्या आहेत.