जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिरवळ चे जिल्हा परिषद सदस्य उदय कबुले तर उपाध्यक्षपदी खटावचे प्रदीप विधाते यांची वर्णी लागली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांनी काम पाहिले यावेळी मुख्याधिकारी संजय भागवत उप मुख्याधिकारी संजय धोत्रे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे जिल्हा परिषद सदस्य व आदी अधिकारी उपस्थित होते
निवड झाल्यानंतर नूतन जिल्हा परिषद अध्यक्षांचा सत्कार न करताच जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे मानसिंगराव जगदाळे व दीपक पवार हे नाराज होऊन निघून गेले त्यांना याबाबत विचारले असता जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यावेळेस म्हणाले सीनेरीटी म्हणून काय आहे का नाही ़ प्रत्येक वेळेस आम्हाला असे डावलले जाते आमच्या तालुक्यात आम्हाला ताकद देण्याचे काम पक्षाने करायला पाहिजे होते तसे झाले नाही त्यामुळे आम्ही नक्कीच नाराज आहोत सभागृहात सुद्धा काही सदस्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी लपून राहिलेले नाही त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे दीपक पवार यांचा समावेश होता
आज झालेल्या निवडीमध्ये अध्यक्षपदाचा मान वाई तालुक्याला मिळाला नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांची वर्णी लागल्याने आमदार मकरंद पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी हे पद दिले असल्याचे बोलले जाते माजी आमदार शशिकांत शिंदे यांचे समर्थक व जिल्हा परिषद सदस्य प्रदीप विधाते यांनाही उपाध्यक्षपदाची लॉटरी लागल्याचे दिसून आले आता जिल्हा परिषद सदस्यांचे जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीकडे लक्ष लागले आहे