विवेकी बुद्धीने पालिकेत बिलांना फुटले पाय

40
Adv

विवेकी बुद्धीची मोहमाया खूप सारी आहे काही टेंडरमध्ये पर हस्ते सहभाग असून भरपूर कागदपत्रांवर सह्या करून विवेकबुद्धीने आपल्या सेवानिवृत्तीनंतर ची कारकीर्दही पालिकेतून सुटणार नाही हे नक्कीच त्याचा सविस्तर वृत्तांत तुम्हाला 31 मे नंतरच कळेल मात्र विवेकबुद्धीने सारे काही पालिकेत चालते हे मात्र नक्की

विवेकी बुद्धीने पालिकेतील बिलांना ऐन करोणाच्या काळात सुद्धा पाय फुटले असून बहुचर्चित व मर्जीतील ठेकेदारांची बिले काढण्याची गडबड पालिकेतील सध्या दिसून येत आहे ही सर्व कृपा फक्त विवेकी बुद्धीच करू शकते स्वतःची सेवानिवृत्ती जशी जवळ येईल तशी गती या बिलांना विवेकबुद्धीने वाढत असल्याचे चित्र सध्या पालिकेत आहे

सातारा पालिकेत समांतर अर्थवाहिनी चालवली जाते. त्याचे हिशोब व तपशीलातल्या नोंदी एका अधिकाऱ्यांच्या डायरीत आढळतात. त्याचा हिशोब हा फक्त ठराविक नगरसेवकांना सादर केला जातो. आता त्या अधिकाऱ्याची सेवानिवृत्ती दोन आठवड्यांवर आल्याने जुन्या पेंडिंग बिलांचा तगादा ठेकेदारांकडून सुरु झाला आहे. काही क्रीडा स्पर्धांची बिले निघावीत म्हणून राजकीय बळ लावले जात आहे. अधिकाऱ्याची सेवानिवृत्ती आणि मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीच्या शक्‍यतेने करोनाचा मनस्ताप बाजूला ठेवून वैयक्तिक अर्थकारणाचे चक्र फिरवायला काही चाणक्‍य उतावीळ झाले आहेत.

Adv