विद्यावर्धीनी चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत छ. शाहू अकॅडमी ऍण्ड सायन्स ज्युनियर कॉलेज या कनिष्ठ महालिद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल ९८.७७ टक्के लागला असून छ. शाहू अकॅडमीने उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
एच.एस.सी. बोर्डामार्ङ्गत घेण्यात आलेल्या १२ वी परिक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला आहे. या परिक्षेत श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या विद्यावर्धीनी चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत छ. शाहू अकॅडमी ऍण्ड सायन्स ज्युनियर कॉलेजने उज्वल यश मिळवले.
कॉलेजचा विद्यार्थी आर्य अभिजित ङ्गाळके याने ९४ टक्के गुण मिळवून प्रथम क‘मांक, पालवी सागर भंडारी हिने ९२ टक्के गुण मिळवून द्वितीय तर, आर्या रमेश जगताप हिने ९०.९२ टक्के गुण मिळवून तृतीय क‘मांक मिळवला. विद्यालयाने निकालाची उज्वल परंपरा कायम राखल्याबद्दल सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि प्राचार्या डिंपल जाधव व सर्व शिक्षकांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.