वडूथ ता. जि. सातारा येथील कृष्णा नदीवरील पुलावरील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम नुकतेच केले होते. मात्र यंदा पावसाळ्यात हे डांबरीकरण पुन्हा वाहून गेल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. राज्य मार्ग ११७ वर असलेल्या या पुलावरून होत असलेली अवजड वाहतूकच या खड्ड्यांना प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच जिल्हाधिकार्यांनी वाहतूकीचे नियम कठोर न केल्यामुळे अवजड वाहतूक येथून सर्रासपणे सूरू असल्यामुळे रस्त्यांची पुरती वाट लागलेली आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. जिल्हाधिकार्यांनी ताबडतोब यावर उपाययोजना कराव्या अन्यथा भरपावसात येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा छत्रपती उदयनराजे मित्र मंडळ वडूथ, सातारचे अध्यक्ष तसेच नमो नमो मोर्चा (भारत)चे सातारा जिल्हाध्यक्ष मदन भीमाजी साबळे यांनी दिला आहे.
प्रत्येक वेळी आम्ही निवेदने दिल्यावरच प्रशासनाला जाग येते. मात्र आता निवेदन न देता थेट ‘रास्ता रोको’ करणार असल्याचा्रआक्रोश वडूथ येथील ग्रामस्थांकडून जात आहे.
वडूथ लोणंद रस्त्यावर असणार्या कृष्णा नदीवरील पुलाच्या समस्यांबद्दल शासनाच्या विविध विभागाला येथील ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकत्यर्डांनी निवेदन देऊन या रस्त्याच्या समस्यंबाबत पाठपुरावा करण्यात येत होता. यासाठी येथील ग्रामस्थांकडून वेळोवेळी रास्ता रोको आंदोलनेही करण्यात आलेली होती. त्यांच्या पाठपुराव्याला २०१९ मध्ये यश आल्याने बांधकाम विभागाने या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम केले होते. मात्र या रस्त्यावरून अवजड वाहतूक होत असल्याकारणाने रस्त्यावरील डांबर उखडून पुन्हा मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी येथील वाहतूकधारांना या खड्ड्यातून वाट काढत असताना वाहतूकीचा पुरता बोजवारा उडला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत असल्याचे समजतेय. जिल्हाधिकार्यांनी जर वेळीच या मार्गावरील अवजड वाहतूक थांबविली असते तर एवढ्या लवकर रस्ता खराब झालाच नसता, अशा संतप्त प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहेत.