महामार्गावर रस्त्यांची दुरावस्था आणि आवश्यक त्या सोयीसुविधा मिळत नसतानाही आनेवाडी आणि खेड शिवापुर येथे केल्या जात असणाऱ्या अन्यायकारक वसुलीमुळे जनता पुरती हैराण झाली आहे त्यामुळे सातारा येथील टोलविरोधी जनता या सामाजिक समूहाकडून तातडीने रस्ते दुरुस्ती करून सोयीसुविधा होई पर्यंत टोल नाक्यावरील टोल वसुली बंद करण्यात यावी ही त्यांची मागणी रास्त असल्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
महामार्गावरील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत जनतेमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटला आहे याबाबत प्रशासन डोळेझाक करत आहे सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी व निवेदन करूनही याबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नाही तरी आपण स्वतः याबाबतीत लक्ष घालून सातारकरांना लवकरात लवकर न्याय द्यावा अन्यथा टोल आंदोलन करण्याची भूमिका सातारकर आणि लोकप्रतिनिधी म्हणून घेतली आहे असही आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे