सातारा-पुणे महामार्गावरील खड्डे येत्या 15 दिवसात मुजवा बैठकीत केल्या सूचना  

38
Adv

अतिवृष्टीमुळे सातारा-पुणे या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, हे खड्डे येत्या 15 दिवसात मुजवा अशा सूचना  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून तसेच लोकप्रतिनिधींकडून देण्यात आल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सूचना देण्यात आल्या. या बैठकीला नवनिर्वाचीत आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय महामर्गावरील व सर्व्हीस रोडवरील खड्डे येत्या 15 दिवसात मुजवा. तसेच आनेवाडी टोलनाक्यावर प्रवाशांसाठी मुलभूत सुविधा चांगल्या पद्धतीने द्या. तसेच सातारा-पुणे महामार्गाच्या कामाच्या प्रगतीची माहिती वेळोवळी जनतेला द्यावी. तसेच या महामार्गावर जाणाऱ्या प्रवाशांना ज्या सुविधा दयावयाच्या आहेत त्या सुविधा चांगल्या पद्धतीने द्याव्यात, अशा सूचनाही या बैठकीत करण्यात आल्या.

Adv