कोरेगाव तालुक्यातील तारगावचे सुपूत्र सीमा सुरक्षा दलातील हवालदार संभाजी भोसले-पाटील यांचा कर्तव्य बजावत असताना दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या कुटुंबियांची आज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भेट घेऊन संत्वन केले
दिवाळीची सुट्टी कुटुंबियांसोबत घालवून तीनच दिवसांपूर्वी कर्तव्यावर हजर झालेल्या या वीर जवानाच्या घरी जाऊन त्यांचे वडील केशवराव भोसले – पाटील, बंधू निवृत्त जवान शहाजी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. भोसले – पाटील कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रसंगात केवळ संवेदना व्यक्त करून आपण थांबू नये तर या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे असे मत ही श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी माजी शिक्षण सभापती सुनील काटकर ,युवा नेते भरत देशमुख आदी मंडळी उपस्थित होते
.याच भूमिकेतून वीरपत्नी व त्यांच्या कुटुंबियांच्या भविष्याच्या दृष्टीने केंद्र सरकार आणि बीएसएफच्या दिल्ली येथील मुख्यालयात पाठपुरावा करून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी मी कटीबद्ध असल्याचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी वेळी कुटुंबांना सांगितले