*पिंपोडे बुद्रुक/प्रतिनिधी,दि.२२:*
संपूर्ण जगावर महाभयंकर अशा कोरोनाच्या संसर्गाने वेढा घातला असून लाखोंच्या संख्येने या आजाराने ग्रस्त आहेत, तर हजारोंच्या संख्येने मृत्यू पावत आहेत.बरे होणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे.या संकटंमय पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या तडवळे.स. वाघोली येथील आधार चॅरिटेबल ट्रस्टने गावच्या कोरोना कमिटीला वैद्यकीय सेवा व मदत देऊन आधार दिला आहे…
हीच परिस्थिती आपल्या सातारा जिल्ह्यात देखील उदभवली असून प्रत्येक गावा गावात कोरोना कमिटी अहोरात्र काम करत आहेत. पण त्यांच्या कडे वैद्यकीय साहित्य नसल्याने असंख्य लोकांना प्राथमिक तपासणी साठी वाठार स्टेशन किंवा तालुक्याचा ठिकाणी जावे लागत आहेत. गावातील नागरिकांना होणारा त्रास व कमिटीची खंत लक्षात घेऊन आधार चॅरिटेबल ट्रस्ट ने
गावातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीच्या दृष्टीने उपयुक्त असे आरोग्य तपासणी किट गावच्या कोरोना प्रतिबंधीत कमिटी कडे सुपूर्द केले आहे.या तपासणी किटमध्ये,एक प्लसऑक्सिमिटर -,थर्मोटेम्प्रेचर मिटर- एक,एन ९५ मास्क- १५,डिस्पोजेबाल मास्क- ५०,सॅनिटायझर कॅन ५ लि -या किटची मदत करण्यात आली आहे.याचा फायदा सर्व नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी होणार असून घरीच,जागेवरच महत्वपूर्ण बेसिक आरोग्य तपासणी होऊ शकणार आहे. यासाठी रुग्ण, जेष्ठ नागरिक, महिला, लहान मुले यांना वाठार किंवा अन्य ठिकाणी तपासणी केंद्रात पाठवण्याची व रिपोर्ट मिळण्याची वाट पाहण्याची गरज पडणार नाही,त्याच प्रमाणे ऊत्तर कोरेगाव गावातील लोकांची चोवीस तास काळजी घेणाऱ्या वाठार स्टेशनच्या पोलीस बांधवाना देखील आधार ट्रस्ट ने ३५० मास्क सामाजिक बांधिलकीतून दिले आहेत….✍️
—————————————————–
*फोटो ओळ :-तडवळे.स.वाघोली येथील आधार संस्थेच्या वतीने पोलीस आणि कोरोना समितीला वैद्यकीय साहित्य व मास्क किट देण्यात आले.*