सोनक्याचे सुपुत्र संजय धुमाळ यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर.

96
Adv

पिंपोडे बु ॥ (प्रतिनिधी ) ता. 14: सोनके ता. कोरेगाव येथील व माजी जि प सदस्य सतीश धुमाळ यांचे बंधु तसेच सध्या ठाणे आंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय नारायण धुमाळ याना नुकताच राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराने सोनकेकरासह उत्तरकोरेगाव करांची मान उंचावली आहे.

सोनके येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले संजय धुमाळ यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनके येथे झाले तर माध्यमिक शिक्षण वाघोली ता. कोरेगाव येथे पूर्ण करून पुढील शिक्षण सासवड ता. पुरंदर येथील वाघेरी विद्यालय व नाशिक येथे पूर्ण केले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असताना त्यानी स्पर्धा परीक्षा दिल्या त्यामध्ये त्यांची सण 1994 मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली सेवाकाळात त्यांनी अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना वळीवाच्या पावसाने नदीला आलेल्या पूरपरिस्थितीत पुरात अडकलेल्या प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनास स्वतःचा जीव धोक्यात घालत पुरात उडी मारून अनेकांचे जीव वाचवले, त्याच बरोबर त्यांनी अमरावती, सपाळा, रोहा, नौपाडा, व अंबरनाथ येथे उल्लेखनीय काम केले आहे त्यामध्ये रोहा येथील कुरीअर कंपनीवर चोरट्यानी लाखो रुपयांचा टाकलेला धाडसी दरोडाचा छडा त्यांनी 24 तासात लावला, नौपाडा येथे कार्यरत असताना एका इमारतीला अचानक आग लागली होती आशा वेळी स्वतः च्या जीवाची पर्वा न करता इमारतीच्या पाचव्या मजल्यावर जावून तेथील लोकांचा जीव वाचवला, अशा वेगवेगळ्या कामगिरी मुळे त्यांना 2 वेळा पोलीस दलाकडून गौरविण्यात आले आहे.

या 15 ऑगस्ट रोजी देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पुरस्काराबद्दल त्यांचे विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार दिपक चव्हाण, माजी जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, नितीनकाका पाटील, मुंबई बाजारसमितीचे संचालक बाळासाहेब सोळस्कर, जिल्हाबँकेचे माजी उपाध्यक्ष लालासाहेब शिंदे, उपसभापती संजय साळुंखे, रामभाऊ लेंभे, सुरेश साळुंखे, नागेशशेठ जाधव, विकास साळुंखे, अशोकराव लेंभे, विजयराव धुमाळ, जितेंद्र जगताप, शिवाजीराव पवार, भुषण पवार, दत्तात्रय भोईटे, शकीला पटेल, अजय कदम, नाना भिलारे, बाळासाहेब भोईटे, हर्षल शिंदे, सरपंच संभाजी धुमाळ आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

Adv