साखर कारखान्यांचे वजन काटे तपासणीसाठी भरारी पथकाची स्थापना करण्याच्या  जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना  

70
Adv

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु करण्यात आला असून साखर कारखान्यांचे वजन काटे तपासणीसाठी भरारी पथकाची स्थापना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तपासणी पथकामध्ये  संबंधित तालुक्याचे तहसीलदार, पोलीस खात्यामधील अधिकारी, वैधमापन शास्त्र विभागाकडील प्रतिनिधी, प्रादेशिक सह संचालक (साखर) यांच्याकडील प्रतिनिधी व शेतकरी यांचे प्रतिनिधी सदस्य असणार आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिली आहे.

हे भरारी पथक स्वयंस्फुर्तीने कारखाना स्थळावर अचानक भेटी देवून वजन काट्यांची तपासणी करतील. शेतकऱ्यांना वजनाची पावती योग्य प्रकारे देण्यात येते किंवा कसे याची खात्री करतील, एखाद्या साखर कारखान्यावर वजनाबाबत गैरप्रकार होत असल्याची तक्रार यंत्रणेस किंवा पोलिसांकडे प्राप्त झाल्यावर लगेच त्या ठिकाणी वजन काट्याची तपासणी करुन गैरप्रकार आढळल्यास यंत्रणेमार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. प्रादेशिक सह संचालक (साखर) पुणे विभाग, पुणे या पदावर धनंजय डोईफोडे कार्यरत असून त्यांचा मोबाईल क्रमांक 9850658125 असा आहे.

Adv