शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा शहर शिवसेना व शिवप्रेरणा प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यांमध्ये सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केल्या नंतर सातारा शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सामाजिक संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच गरीब व गरजू व्यक्तींना शहर शिवसेनेच्या वतीने मास्क, सॅनिटायझर, फेस शिल्ड वाटप करण्यात आले. यावेळी प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना प्राथमिक स्वरूपात हे वाटप करण्यात आले यामध्ये 3000 मास्क, 500 सॅनिटायझर, 500 फेस शिल्ड यांचे वाटप त्यांच्या घरी अथवा कामाच्या ठिकाणी गरजू व्यक्तींना करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे नियोजन शिवसेना शहर प्रमुख व शिवप्रेरणा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, उपशहर प्रमुख आणि प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शिवाजीराव इंगवले यांनी केले.त्यांना प्रतिष्ठान चे सदस्य प्रकाश भोसले,दीपक पाटील, विनोद निकम, कुमार पोतदार,मनोज निंबाळकर, निलेश शिंदे तसेच शहर शिवसेनेचे सुनिल भोसले, सुमित नाईक,हेमंत उबाळे,विनायक शिंदे यांनी सहकार्य केले.
यावेळी शहर प्रमुख बाळासाहेव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शिवजीराव इंगवले यांची महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या सदस्य पदी नियुक्ती झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी कोव्हिड योद्धे राजेंद्र चोरगे- बालाजी ट्रस्ट, दीपक प्रभावळकर – तरुण भारत,वसंत जोशी – सवयभान संस्था, विनित पाटील ,डॉक्टर संजय कोरे,वाहतूक निरीक्षक विठ्ठल शेलार,विरेन जानी ,श्रीराम स्वाध्याय परिवार,फोटोग्राफर – संजय कारंडे, तरबेज बागवान, दशरथ रणदिवे, नरेंद्र जाधव, आदेश गंगावणे, उल्हास भिडे,रिझवान सय्यद,इलेक्ट्रॉनिक मिडियाचे संदिप शिंदे, सुशील क्षिरसागर, संतोष कांबळे, सादिक भाई,प्रकाश बापट, जयंत लंगडे,प्रमोद मोरे,विजय ल्हासुरने,शीतल राजेशिर्के,निखिल मोरे,माधव सारडा,सनी शिंदे,ओंकार कदम, मैत्री प्रतिष्ठाण- हर्षल चिकणे, प्रताप जाधव- शिवसेना उपजिल्हाप्रमुख, दत्ताजी नलावडे- सातारा तालुका प्रमुख, रमेश बोराटे – उपतालुका प्रमुख, सचिन जगताप – वाहतूक सेना, दिनेश देवकर, झाझुर्णे, प्रशांत नलावडे – धर्मवीर युवा मंच, मेजर रवींद्र शेळके,मंगेश जाधव, धनंजय शिंदे, नितीन नारकर इत्यादीचा कोव्हिड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. शिवाजीराव इंगवले यांनी आभार मानले.
Home Satara District Satara City सातारा शहर शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा*