सातारा जिल्हा आणि शहरात कोरोनाचा अटकाव करण्यासाठी प्रशासन म्हणून अधिकारी रस्त्यावर उतरून काम करत आहेत.या अधिकाऱ्यांच्यामुळे सातारची जनता सुरक्षित आहे.त्यांचे कार्य अतुलनीय असे आहे.आपले जिल्हाधिकारी शेखर सिंह हे महत्वाची भूमिका बजावत आहेत, त्याच बरोबर जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम, जिल्हा शैल्य चिकित्सक अमोद गडीकर, प्रांत अधिकारी मिनाज मुल्ला हे महत्वाची भूमिका बजावत आहे असे उदगार शिवप्रेरणा प्रतिष्ठानचे संस्थापक तथा शिवसेनेचे सातारा शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी काढले.
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा सत्कार शिवप्रेरणा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवप्रेरणा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शिवाजीराव इंगवले, दीपक पाटील, मनोज निंबाळकर, विनोद निकम, निलेश शिंदे, कुमार पोद्दार, प्रकाश भोसले इत्यादी सदस्य उपस्थित होते. जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम, उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, सातारा प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, समीर शेख सहायक पोलिस अधीक्षक, तहसीलदार आशा होळकर,सातारचे मुख्याधिकारी रंजना गगे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत,नगराध्यक्ष माधवी कदम,उपनगराध्यक किशोर शिंदे, सातारा शहर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, विशाल वायकर शाहूपुरी पोलीस निरीक्षक, विठ्ठल शेलार ट्राफिक पोलीस निरीक्षक यांना ही सन्मानित करण्यात आले.यावेळी बोलताना बाळासाहेब शिंदे म्हणाले, कोरोना महामारीचे संकटात सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्याचे काम व सर्व नियोजन महसूलचे अधिकारी, सुरक्षितता म्हणून बंदोबस्ताचे काम पोलीस आणि उपचाराचे काम डॉक्टर करत आहेत.त्यामुळे हे खऱ्या अर्थाने कोव्हिडं योद्धे आहेत.त्यांच्या कार्याचा सन्मान करावा तेवढा कमीच असून कार्य करत राहणे आपले कर्तृत्व पार पाडणे हेच त्यांनी उद्दिष्ट ठेवले आहे, त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, असे बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.