मौजे शिंदी बु. तालुका माण येथील यशवंत घरकुल योजनेकामी एका लाभार्थी यांनी शासन दरबारी घरकुल प्रस्ताव देते वेळी बनावट कागदपत्र सादर करून घरकुल योजेनेचा लाभ करून घेतला आहे. प्रस्ताव मधे सादर केलेले जमीन क्षेत्र आणि प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्र या मधे प्रंचड तफावत असून देखील अधिकारी वर्गास हाताशी धरून शिंदी बु येथील गट नंबर 600 मधील समाईक क्षेत्रामधे अतिक्रमण करुण घरकुल
बांधकाम केले आहे.
या संपूर्ण प्रकारची ग्रामपंचायत स्तरा वर सर्व माहिती घेऊन किरण खरात यांनी बनावट कागदपत्रे सादर करुण शासनाची फसवणूक करणाऱ्या लाभार्थी यांचे विरोधात या प्रकरणी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, यांचेकडे तक्रार दाखल करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषीवर तात्काळ कारवाई करणेची मागणी केली होती त्याप्रमाणे मा. उपमुख्य कार्यकारी बांधकाम विभाग जिल्हा परिषद सातारा यांनी सदर प्रकरणाची दखल घेऊन तात्काळ चौकशी करण्याचे मा. गट विकास अधिकारी माण यांना आदेश दिले आहेत. या संपूर्ण प्रकारा मधे सदर लाभार्थी यांनी ग्रामपंचायत प्रशासन आणि पंचायत समिति प्रशासन यांची फसवूनक केले कामी त्यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम कायद्याच्या अन्यवे फौजदारी गुन्हा दाखल करून ते अतिक्रमण तात्काळ हटविन्यात यावे अशी मागणी शिंदी बु येथील ग्रामस्थानी निवेदनच्या द्वारे गटविकास अधिकारी माण यांचे कड़े केली आहे यावेळी शशिकांत खरात, किरण खरात गौतम खरात आदि उपस्थित होते.
सदर प्रकरणाची चौकशी मा. सहायक गटविकास अधिकारी भरत चौगुले यांचेकडे दिली असून या प्रकरणी चौकशी करुण दोषीवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
जी. डी. शेलार गटविकास अधिकारी माण