जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोनाचा विळखा घट्ट होत चालला असून केवळ कंटेनमेंट झोन जाहीर करण्यापेक्षा प्रभावी उपाययोजना महत्वाची ठरणार आहे. मात्र, कोणत्याच तालुक्यात करोनाची साखळी तुटत नाही, जिल्हाबंदीचा ढोल पिटला तरी जिल्ह्यात येणारे पुणे मुंबईकर यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या उपाययोजनांमधील त्रुटी चव्हाट्यावर येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर होण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सात दिवसाचा लॉक डाऊन जाहीर होण्याची शक्यता ? नाकारण्यात येत नाही
शहरात नऊ कंटेनमेंट झोन आत्तापर्यंत झाले, या भागांचा घरोघरचे सर्वेक्षण पूर्ण थांबले आहे. टाळेबंदी शिथिल केल्यावर लोकांचे वर्तन बेछूट झाले आहे. रस्ते, चौक, बाजारपेठा, मंडई या प्रत्येक ठिकाणी लोक नेहमीप्रमाणे गर्दी करत आहेत. सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत मारवाडी चौक ते देवी चौक हा रस्ता गेले तीन दिवसांपासून ट्रॅफिक जाम होत आहे येथेही कोणाचा धोका जास्त निर्माण होण्याची शक्यता दिसते
. साताऱ्यातील बहुतांश रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. परंतु या रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा इतर रुग्णालयांत आणण्यासाठी पुरेशा रुग्णवाहिकाही उपलब्ध नाहीत. दुर्गम भागातील रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी आणण्यासाठी खासगी वाहनेही कुणी देत नाही. रुग्णवाहिका मिळाली तरी ती चालवण्यासाठी चालक मिळत नाहीत. या साऱ्यामुळे रुग्णास उपचार मिळण्यास उशीर होतो आहे.