मौजे शिंदी बुध्रुक तालुका माण येथील नागरिकांनी आज तहसीलदार माण यांची भेट घेऊन समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करुण निवदेन दिले
.
या मधे शिंदी बु येथील तुपेवाड़ी लघु पाटबँधारे करिता शिंदी बुध्रुक येथील खातेदार यांची गट क्रमांक 600 मधील सुमारे 10 एकर जमीन भूसंपदान कार्यालय सातारा यांनी अधिग्रहण केली होती परंतु अद्याप 15 वर्ष उलटून सुद्धा या खातेदारना कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही. तसेच या गट नंबर 600 मधे काही मोजकया लोकांनी अतिक्रमण केले आहे त्यामुळे बौद्ध समाजातील इतर शेतकरी यांचे न्याय्य हक्कावर गदा आली आहे. तरी या संपूर्ण प्रकारची चौकशी तहसीलदार माण यांनी करावी अशी मागणी करण्यात आली. अन्यथा आंदोलनचा मार्ग स्विकारवा लागणार असलेचे सांगितले या निवेदनावर समाजातील सर्व नागरिकांनी सह्या केल्या आहेत. यावर नायब तहसीलदार माण श्री. करे साहेब यांनी सकरात्मक चर्चा करून सदर निवेदन तात्काळ पुढील कार्यवाही साठि रवाना केले.या प्रसंगी प्रभाकर खरात, शशिकांत खरात, गौतम खरात किरण खरात आदी उपस्तिथ होते.