शशिकांत शिंदे यांनी मतदारसंघ विकासापासून वंचित ठेवला, उदयनराजे भोसले* 

59
Adv

शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही मतदारसंघ विकासापासून वंचित ठेवला त्यामुळे गेली कित्येक दिवस येथील जनता त्रस्त आहे. महेश शिंदे यांच्या रूपाने या मतदारसंघाला उमदे नेतृत्व मिळाले आहे, असे प्रतिपादन सातारा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनीनी केले.दरम्यान  पदे मिळाल्यानंतर शशिकांत शिंदे यांना जनतेचा विसर पडल्याचा आरोप त्यांनी केला.

 सातारा लोकसभेचे भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व कोरेगाव- खटाव विधानसभेचे शिवसेना व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ खटाव येथे काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेनंतर आयोजित कोपरा सभेत उदयनराजे बोलत होते. यावेळी महेश शिंदे , नितीन बानूगडे पाटील,प्रताप जाधव, समृद्धी जाधव,काका धुमाळ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, सुनील खत्री,ऍड. नितीन भोसले, राहुल पाटील ,सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, कुदळे सर ,राजू कराळे, शिवसेना गटप्रमुख आमीन आगा, महेश काळे आदी उपस्थित होते.

उदयनराजे पुढे म्हणाले,दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न केला. मात्र गेले काही दिवस त्यांच्याबरोबर आम्ही होतो ,त्यांनी केवळ आमचा व जनतेचा विश्वास घातच केला .काँग्रेसवाले तर म्हणायचे आम्ही दगडाला शेंदूर लावला तरी आमचा उमेदवार निवडून येतो. एवढा विचित्रपणा याठिकाणी होता.जेव्हा लोक तुम्हाला निवडून देतात ,त्यावेळी त्यांच्या काही अपेक्षा असतात, त्यांची पूर्तता करणे आपले काम असते. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीने जनतेला झुलवण्याचे काम केले आहे .1996 साली जिहे कटापूर योजना अस्तित्वात आली मात्र गेली कित्येक दिवस ही योजना पूर्ण होऊ शकली नाही. या मतदारसंघाचे आमदार असलेले शिंदे यांच्याकडे पालकमंत्रिपद होते, मंत्री होते मात्र त्यांनी ही योजना पूर्ण होण्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे जनतेत प्रचंड नाराजी आहे.

कोरेगाव ,खटाव मतदारसंघात आम्ही अनेक कामे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मार्गी लागली. या भागाला महेश शिंदे यांच्या रूपाने उमदे नेतृत्व मिळाले असून जिहे कठापुरचे कामही अंतिम टप्यात आहे.आम्ही कधी पदासाठी, सत्तेसाठी काम केले नाही.जनतेचा विकास हेच ध्येय ठेऊन आम्ही काम केले,असेही उदयनराजे म्हणाले.

दरम्यान कोपरा सभेपूर्वी खटाव गावात जोरदार शक्तिप्रदर्शन करत पदयात्रा काढन्यात आली. यामध्ये युवक, युवती, महिला, नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

 
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि महेश शिंदे यांनी गुरुवारी पदयात्रा आणि गावभेटी  घेत मतदारांशी संवाद साधला. खटाव, बुध, डिस्कळ, ललगुन,पुसेगाव ,चिलेवाडी भाडळे आदी ठिकाणी काढण्यात आलेल्या पदयात्राना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी भाजप-शिवसेना,रासप ,रयत क्रांती मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पुसेगाव येथील पदयात्रेत सरपंच सौ.गोरे,उपसरपंच रणधीर जाधव, माजी सरपंच भरत मुळे, दीपाली मुळे, अंकुशराव जाधव, रोहन देशमुख आदी सहभागी झाले होते.

Adv