शाहपुरीत होणा-या अनियमित व अपु-या पाणीपुरवठयाबाबत शाहूपुरीचे पंचायत समिती सदस्य श्री संजय पाटील व सरपंच श्री गणेश आरडे यांनी महाराष्ट्र जीवनप्राधिकरण कार्यकारी अभियंता श्री महाजन यांची भेट घेउन निवेदन दिले.
यावेळी शाहूपुरीभागाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण होणा-या पाणीपुरवठा हा सुमारे ३ वर्षापासुनविस्कळीत झाला असून पाणी सोडण्याबाबत कोणतेही वेळापत्रक नाही. तसेच पाणी पुरेशा याला दाबाने व योग्य दाबाने येत नाही. काही भागात पाणी अत्यंत कमी वेळ येते त्यामुळे नागरिकांना पदरमोड करुन टॅकर मागवावा लागत आहे. ही वस्तुस्थिती निदर्शनास आणून
दिली. यापूर्वीच्या अधिका-यांकडे वेळोवेळी या समस्यांबाबत पाठपुरावा करुन देखील परिस्थतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही असे सांगितले.
शाहूपुरीसाठीच्या स्वतंत्र कण्हेरपाणीपुरवठा योजनेचे काम सुरु असून त्यासाठी लागणारे वाढीव कामे व अतिरिक्त निधी यांचा प्रस्ताव मा.खा. श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सुचनेनुसार शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे असेही श्री संजय पाटील यांनी सांगितले त्यावेळी कार्यकारीअभियंता श्री महाजन यांनी सध्या होणारा पाणीपुरवठा सुरळीत करणेबाबत व नवीन योजना लवकरात लवकर सुरु करणेसाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली.यावेळी ग्रामपंचायत शाहूपुरी उपसरपंच राजेंद्र गिरी, ग्रामपंचायत सदस्य शंकर किर्दत,
सुधाकर यादव, रमेश धुमाळ, माजी उपसरपंच अमित कुलकर्णी, सौ मुग्धा पुरोहित, सौ मयुरा कुलकर्णी, सौ लता राजापुरे, सौ धनश्री ग्रामोपाध्ये, श्रीमती लिलाबाई शितोळे असे
उपस्थित होते.