45 सातारा लोकसभा पोटनिवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र भरण्याचा दिनांक आणि निकाल जाहिर झाल्याचा दिनांक या दरम्यान उमेदवार किंवा त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधीने केलेल्या निवडणुकीच्या संबंधातील सर्व खर्चाचे व अचुक लेखे ठेवण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.
निवडणूक खर्चाचे उमेदवार दैनंदिन खर्च नोंदवही, मुळ प्रमाणके, अद्यवात बँक विवरणपत्रे तपासून घेण्याबाबत सूचित केले आहे. त्यानुसार दि. 12, 16 व 20 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत कॉन्फरन्स हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे लेख्यांची तपासणी खर्च निरीक्षक करणार आहेत.