जावलीतील सातबारावरील बोज्याचा विषय मार्गी लावणार : उदयनराजे भोसले

108
Adv

 गेल्या निवडणूक प्रचारावेळी आम्ही सातबाऱ्यावरील शिक्के काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तीन महिन्यात राजीनामा दिल्याने हा विषय मिटवता आला नाही. मात्र शिवेंद्रसिंहराजे आणि माझी या विषयावर चर्चा झाली असून निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर हा विषय तात्काळ मिटवला जाईल. त्यासाठी संबंधित गावात कमिटी नेमून हा विषय मिटवला जाईल.

युवक व बेरोजगारांची आर्थिक उन्नती उंचावण्यासाठी जावलीत अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प होणे गरजेचे आहे. यासाठी शिवेंद्रराजे यांच्यासारखा तुम्हाला जपणारा चांगला नेता मिळाला आहे. जावळीला गतिमान नेतृत्व लाभल्याने मतदारसंघाचा अधिक विकास झाला आहे. बाबाराजेंनाही येथील जनतेचे मोठे पाठबळ लाभत आहे. आमच्यामुळे तुम्ही नसून तुमच्यामुळे आम्ही आहोत,हीच जाण ठेवून जावलीचा विकास करणार आहे. आम्ही दोघे आज किंवा भविष्यात कधीही राजकारण न करता आपणा सर्वांना बरोबर घेऊन विकासकामे करणार आहे,अशी ग्वाही यावेळी उदयनराजेंनी दिली.

Adv