सातारा जिल्‍हयाच्या विकासासाठी धाडसी निर्णय घेतला.  श्री छ उदयनराजे

56
Adv

सातारा जिल्‍ह्याने संपूर्ण देशाला दिशा दिली हा इतिहास आहे. म्‍हणूनच भाजपाच्‍या माध्‍यमातून विकासाचे नवे पर्व सुरू करण्‍यासाठी निवडून आल्‍यावर अवघ्‍या तीन महिन्‍यात खासदारकीचा राजीनामा दिला. असे धाडस दाखवण्‍याचे केवळ राज्‍यातीलच नव्‍हे, तर देशातील हे एकमेव आणि पहिले उदाहरण आहे. फक्‍त आणि फक्‍त सातार्‍याचा विकास हेच ध्‍येय समोर ठेवून आपण हा निर्णय घेतला. नव्‍याने जनतेचा कौल घेतानाही लोकशाहीतील राजे आमची प्रचंड मताधिक्‍क्‍याने पाठराखण करतील, अशी खात्री वाटते, असा दृढविश्‍वास श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्‍यक्‍त केला आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक आणि सातारा – जावली विधानसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीतील भाजप- शिवसेना- रिपाई व मित्रपक्षांच्‍या महायुतीचे उमेदवार अनुक्रमे श्री. छ. उदयनराजे भोसले आणि श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्‍या निवडणूक प्रचारार्थ येथील कल्‍याण रिसॉर्ट सभागृहात आयोजित सातारा व जावली तालुक्‍यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्‍त्‍यांच्‍या जाहीर मेळाव्‍यात ते मतदारांशी संवाद साधत होते.

या वेळी श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, जि. प.चे माजी अर्थ सभापती सुनील काटकर, राजू भोसले, बाळासाहेब गोसावी, संदीपभाउ शिंदे, सर्जेराव सावंत, भिकूभाउ भोसले, चंद्रकांत जाधव, धर्मराज घोपडे, बबनराव देवरे, जि. प. सदस्‍या सौ. अनिताताई चोरगे यांची प्रमुख उपस्‍थिती होती.

नदी जोड प्रकल्‍प किंवा ग्रामिण आणि शहरी भागाच्या औद्योगिकरणाचे स्‍वप्न केवळ भारतीय जनता पक्षाच्या दुरदृष्‍टीमुळेच साकार होवू शकते असे सांगुन श्रीमंत छत्रपती उदयनराजे पुढे म्‍हणाले की, सन 1996 मध्ये स्‍व.अटलबिहारी वाजपेयींचे सरकार देश चालवित होते. तेव्हा आणि सध्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्‍वाखाली कार्यरत असणारे महायुतीचे सरकार असो, या मंडळींना देशातील गोरगरिबांची दुखेः दूर करण्याची तळमळ आहे. त्‍यामुळेच मुख्य प्रवाहात सामिल होत साता-याचे नंदनवन व्हावे म्‍हणूनच आम्‍ही भाजपामध्ये गेलो आहोत.रखडलेले व रखडवलेले अनेक प्रकल्‍प भाजपाने मार्गी लावले आहेत. आमच्या विरोधात निवडणुक लढवणारे आणि आम्‍हावर टिका करणारे जेष्‍ठ आणि श्रेष्‍ठ मंडळींनी अनेक महत्‍वाची पदे भुषविली आहेत.ते त्‍या पदांवर असताना,आपल्‍या भागाचा का विकास करु शकले नाहीत, केवळ आपल्‍या बगलबच्यांना सांभाळण्याचाच उद्योग त्‍यांनी केला.उच्यस्‍तरीय पदे भुषविल्‍यावर आमदार व खासदार होण्यात त्‍यांना या वयात का रस निर्माण झाला याचा जनतेने विचार करावा आणि मतपेटीव्दारे त्‍यांना धडा शिकवावा असे आवाहन केले.

श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे म्‍हणाले, आपल्‍या मतदार संघाचा विकास साधावयाचा असेल तर सत्‍तेच्या विरोधात राहुन चालत नाही. सध्या राज्‍यासह संपूर्ण देशात भाजपाचा वारु वेगाने दौडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखे सक्षम आणि कणखर नेतृत्‍व देशाला प्रगतीपथावर नेत आहे.अश्या परिस्‍थितीत विकासाच्या बाजुने आपण आणि जनतेला नेण्यासाठीच आम्‍ही महायुतीच्या माध्यमातुन निवडणुकीला सामोरे जात आहोत. प्रत्‍येक कार्यकर्‍त्‍याने आपण स्‍वतः उमेदवार आहेत असे समजुन, ग्रामपंचायत निवडणुकीत केली जाणार धावपळ यावेळीही करावी, जेणेकरुन मतदानाची टक्‍केवारी वाढेल. कार्यकर्‍त्‍यांनी व पदाधिकारी यांनी मतदार यादीचा अभ्‍यास करावा. गाफिल न राहता, निवडणुकीसाठी यंत्रणा राबवावी. यश आपलेच आहे मात्र प्रचंड मताधिक्‍य मिळवून लोकसभा आणि विधानसभेला आम्‍हास निवडुन द्यावे.

Adv