Thursday, April 23, 2026
spot_img
Home Satara District Satara City किसनवीर कारखान्याच्या मदतीसाठी अजितदादांनी दिला शब्द

किसनवीर कारखान्याच्या मदतीसाठी अजितदादांनी दिला शब्द

323
Adv

किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाची नवी इनिंग सुरू झाली आहे मात्र कारखान्याला कर्जाच्या विळख्यातून कसे सोडवायचे यावर राजकीय मंथन सुरू झाले आहे यासंदर्भात मकरंद पाटील आणि संचालक मंडळाने रविवारी रात्री शासकीय विश्रामगृहामध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेतली या भेटीमध्ये दादांनी तपशीलवार चर्चा न करता किसनवीर कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी नक्की मदत करू असे स्पष्ट आश्वासन दिले यासंदर्भात लवकरच मुंबईमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होण्याची माहिती समोर येत आहे

किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या पाच तालुक्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर ऊस उभा असून कारखान्याची कर्जफेड आणि इतर थकलेली देणी कामगारांचे पगार तातडीने दिले जावेत अशी अपेक्षा सभासद शेतकरी करत आहेत कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमदार मदन भोसले यांची 19 वर्षाची सत्ता आमदार मकरंद पाटील यांच्या कारखाना बचाव शेतकरी पॅनलने उलथवून टाकत नवी इनिंग सुरू केली आहे आमदार मकरंद पाटील यांनी आपली जबाबदारी ओळखत तातडीने पावले टाकल्यावर भर दिला आहे

रविवारी सायंकाळी आमदार मकरंद पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील तसेच संचालक मंडळाचे बहुतांश सदस्य यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची शासकीय विश्रामगृहामध्ये भेट घेतली या भेटीमध्ये किसनवीर कारखान्यातील मकरंद पाटील यांच्या जिगरबाज विजयाचे अजित दादांनी आधी तोंड भरून कौतुक केले कारखान्यातील शेतकरी अडचणीत येता कामा नये या दृष्टीने कारभार कारभार झाला पाहिजे अशी अपेक्षा यावेळी अजितदादांनी व्यक्त केली . कारखान्याच्या थकीत कर्ज आणि इतर देणी या विषयांवर सुद्धा चर्चा झाली मात्र या चर्चेमध्ये कोणतेही सूचक वक्तव्य अजितदादांनी केले नाही मात्र कारखाना निश्चितपणे अडचणीतून बाहेर काढू असे आश्वासन दादांनी चर्चेदरम्यान आमदार मकरंद पाटील यांना दिले

किसनवीर कारखान्याच्या या कळीच्या मुद्द्यावर लवकरच मुंबईमध्ये येण्याचे आमंत्रण अजित दादा आमदार पाटील यांना देत पुढच्या हालचालींचे सूतोवाच केले आहे कारखान्याच्या भवितव्या संदर्भात कोणती पावले उचलली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

Adv