काल झालेल्या कोरोना ग्रस्त व्यक्तीचा अंत्यविधी संगम माहुली येथे झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे संगम माहूली नदीवर अंत्यविधी करण्यास ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे
संगम माहुली मध्ये बाहेरील लोक येत असल्यामुळे कोरोना चा प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता जास्त आहे.याचा जास्त धोका हा संगम माहुली गावातील लोकांना होण्याची शक्यता असुन. हे सर्व धार्मिक विधी करण्यासाठी गावातील काही लोक मदत करतात तरी प्रशासनाने लवकरात लवकर यावर उपाययोजना करावी. अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे
संगम माहूली येथे काल अंत्यविधी केल्याने गावातील सर्व ग्रामस्थ व महिलां यांच्या भितीचे वातावरणात निर्माण झाले आहे.अंत्यविधी क्षेत्र हे गावातील लोकांची वस्ती जवळच आहे.तरी जिल्हाधिकारी यांनी कोरोना ग्रस्ताची अंत्यविधी ही संगम माहूलीत न करता त्यासाठी गावापासून व लोकवस्ती पासून दुर अंतरावर अंत्यविधी ची सोय करण्यात यावी हि विनंती ग्रामपंचायतीने जिल्हाधिकार्यांना केली आहे