उपाध्यक्षपद सोडून सातारा पालिकेत सभापतींची होणार निवड

57
Adv

सातारा विकास आघाडीची सत्ता येऊन तीन वर्ष पूर्ण झाली आहे . त्यामुळे सत्ताधारी आघाडीच्या जास्तीत जास्त नगरसेवकांना संधी मिळण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली असून वर्षपूर्ती करणाऱ्या सभापतींना बदलले जावे यासाठी उदयनराजे यांच्याकडे राजकीय आग्रह सुरू झाला आहे .

श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी सातारा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी पुणे येथे अनौपचारिक बैठकीत चर्चा करून पालिकेतील सद्यस्थितीचा आढावा घेतला होता . त्यामध्ये विषय समित्यांचे सभापतीपद निवडण्याच्या विषयावर चर्चा झाली माजी खासदार उदयनराजे भोसले येत्या 2 जानेवारी रोजी साताऱ्यात सातारा विकास आघाडीची बैठक घेणार असून सर्व नगरसेवकांची मते आजमावली जाणार आहेत .

.बांधकाम, आरोग्य नियोजन , महिला व बालकल्याण व पाणीपुरवठा या पाच समित्यांच्या सभापतींना गतवर्षी 27 डिसेंबरला पदाची जवाबदारी देण्यात आली होती . त्याची मुदत संपल्याने नवीन सभापतीं साठी पुन्हा यदु नारकर, , अनिता घोरपडे सुमती खूटाळे यांची नावे चर्चेत आहे . काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा आग्रह धरला जात आहे .

(उदयनराजे भोसले यांचे करंजे येथील खंदे समर्थक स्व . सतीश उर्फ टिल्लू पवार यांच्या पत्नी लता पवार यांना संधी देण्याची मागणी होऊ लागली आहे .)

उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, यांना उदयनराजे भोसले यांनी मुदतवाढ देण्याचे संकेत दिले आहेत . या यादीमध्ये आरोग्य सभापती विशाल जाधव यांचेही नाव सामील झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे . घंटागाडी चालकाला मारहाण करणाऱ्या सभापती नी स्वच्छ भारत अभियानात कामांचा असा ध्यास घेतलाय की विचारण्याची सोय नाही . या सभापतींना मुदतवाढ मिळण्याच्या राजकीय संकेतावर सुद्धा येत्या 2 जानेवारीच्या बैठकीत खलं होणार आहे .

उदयनराजे भोसले यांना लोकाभिमुख कारभार करणारे सहकारी हवे आहेत . राजमाता कल्पना राजे भोसले यांनी सत्ताधाऱ्यांना स्वतः पालिकेत जाऊन कानपिचक्या दिल्या आहेत . मात्र पदाधिकाऱ्यांना टक्केवारीचा कीडा चावल्याने सातारकरांच्या प्रश्नांशी घेणे देणे नसल्या प्रमाणे काम सुरू आहे .

उदयनराजे भोसले येत्या दोन दिवसात साताऱ्यात येत असून नव्याने सभापती निवडी करण्याच्या विषयावर सखोल चर्चा सातारा विकास आघाडीच्या बैठकीत होणार आहे .

Adv